(रत्नागिरी)
येथील भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर वरिष्ठ महाविद्यालयात मंगळवारी जागतिक लोकसंख्या दिनाचे औचित्य साधून आजीवन अध्ययन व विस्तार विभाग आणि रत्नागिरी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमावेळी प्रमुख अतिथी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव न्यायाधीश एम. जी. गोसावी यांनी आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाचे औपचारिक उद्घाटन केले. श्री. गोसावी यांनी तरुण पिढीला कायदेविषयक ज्ञान आवश्यक आहे असे मत व्यक्त केले.
यावेळी यतीन धुरात, पल्लवी धोत्रे यांनी विद्यार्थ्यांना खूप चांगल्या प्रकारे कायदेविषयक मार्गदर्शन, बालकांचे हक्क, कायदे याविषयी मार्गदर्शन केले. महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या सौ. मधुरा पाटील यांनी अध्यक्षीय भाषण केले. या कार्यक्रमाला उपप्राचार्या सौ. वसुंधरा जाधव, प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डीएलएलई विभागप्रमुख प्रा. दिप्ती कदम यांनी केले. प्रा.मिथिला वाडेकर यांनी आभार मानले.