(रत्नागिरी)
रिक्षातून जाणाऱ्या महाविद्यालयीन युवतीशी अश्लिल वर्तन करणाऱ्या रिक्षा चालकाची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आल़ी आहे. रविवारी त्याची पोलीस कोठडी संपत असल्याने पोलिसांकडून त्याला न्यायालयापुढे हजर करण्यात आले होत़े. रत्नागिरी शहर पोलिसांकडून या गुन्ह्याचा सखोल तपास करण्यात येत आह़े. त्यासाठीच 3 दिवसांची पोलीस कोठडी पोलिसांकडून घेण्यात आली होत़ी. अविनाश म्हात्रे (ऱा शांतीनगर, रत्नागिरी) असे अटक करण्यात आलेल्या रिक्षाचालकाचे नाव आह़े.
महाविद्यालयीन तरुणीशी अश्लिल वर्तन केल्याप्रकरणी पोलिसांनी भादंवि कलम 354 व 354 (अ) नुसार शहर पोलिसांत गुन्हा दाखल केला आह़े. अटक करण्यात आल्यानंतर पोलिसांकडून पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होत़ी. म्हात्रे याने अन्य काही महिलांशी गैरवर्तन केले असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली होत़ी. त्यानुसार पोलिसांकडून तपासाची चक्रे फिरवण्यात आल़ी.
पीडित युवतीने शहर पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीनुसार ती कुवारबाव येथील रहिवासी असून रत्नागिरीतील महाविद्यालयात शिक्षण घेत़े. 13 जून 2023 रोजी दुपारी 3.30 च्या सुमारास पीडिता ही महाविद्यालय सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी जयस्तंभ येथील बसस्टॉपवर घरी जाण्यासाठी उभी होत़ी. यावेळी संशयित आरोपी रिक्षाचालक याने आपण कुवारबाव येथे शेअर रिक्षाने जात असल्याचे युवतीला सांगितल़े. त्यानुसार पीडिता आरोपी याच्या रिक्षामध्ये बसली होत़ी.
रिक्षात युवती एकटी असल्याचा फायदा घेत रिक्षाचालक अविनाशने तिच्याशी अश्लिल वर्तन केले, असा आरोप अविनाशवर ठेवण्यात आला आह़े. दरम्यान संबंधित युवतीने घडला प्रकार समाजमाध्यमांवर टाकल्याने रत्नागिरीत खळबळ उडाली होत़ी. दरम्यान शहरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून संशयित रिक्षाचालक अविनाशला तातडीने पोलिसांकडून अटक करण्यात आल़ी.