(मुंबई)
मुंबई आणि गुजरातमधून तब्बल ३१७ कोटींच्या बनावट नोटा जप्त करण्यात धक्कादायक बातमी आली आहे. या प्रकरणी मुंबईतून मुख्य आरोपी विकास जैन याला अटक करण्यात आली आहे. तर मुंबई आणि गुजरातमध्ये अन्य ५ जणांना अटक करण्यात आली आहे.
मुख्य आरोपी विकास जैन याचा मुंबईच्या वेगवेगळ्या भागात कुरियर फर्म चालवत होता. याच फर्मच्या माध्यमातून विकास जैन बनावट नोटांचं रॅकेट चालवत होता, अशी माहिती पीटीआयनं दिली आहे. मुंबई, आणंद, सूरत आणि जामनगर या चार शहरात विकास जैन मोठ्या प्रमाणात बनावट नोटांचं रॅकेट चालवत होता.
गुजरात पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, विकास जैन या चार शहरातून देशभरात बनावट नोटा पाठवत होता. गुजरात पोलिसांना याचा सुगावा लागल्यानंतर त्यांनी तात्काळ कारवाई केली. त्यांनी मुंबईतून विकास जैन याला बेड्या ठोकल्या तर अन्य पाच आरोपींना पाच शहरातून अटक केली.
उत्तर भारतामधील वेगवेगळ्या शहरात बनावट नोटा छापल्या जात होत्या. या बनावट नोटा आपल्या कुरिअर कंपनीच्या माध्यमातून तो मुंबईला पाठवत होता. मुंबईतील एका गोदामात नोटा साठवत होता. गुजरात पोलिसांनी मुंबई पोलिसांच्या मदतीनं मुंबईतील अड्ड्यावरुन 317 कोटींपैकी 227 कोटी किमतीच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत.