(मुंबई)
देशभरात ड्रेनेज लाईन साफ करताना विषारी वायूमुळे कामगारांचा मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडत आहेत. मात्र मुंबईतील कांदिवलीमध्ये ड्रेनेज लाईन साफ करताना एक धक्कादायक घटना घडली आहे. कामगार मॅनहोलमध्ये ड्रेनेजलाईन साफ करून बाहेर येत असतांना त्याच्या अंगावरून गाडी गेल्यामुळे त्याच्या मृत्यू झाला आहे.
मुंबईच्या कांदिवलीतील डहाणूकरवाडी परिसरातील रस्त्यावरील मेन हॉल सफाई करून पुन्हा बाहेर येत असताना कर्मचाऱ्याच्या अंगावरून कार गेली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. तेव्हा त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. सदर संपूर्ण घटना हि सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे.
Viral Video : ड्रेनेज साफ करताना कामगाराच्या अंगावरून गाडी गेल्याने कामगाराचा मृत्यू pic.twitter.com/6RjSLHt5xn
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) June 26, 2023
या प्रकरणामध्ये कारचालक विनोद उधवानी आणि कंत्राटदार अशा दोघांनाही ताब्यात घेतले असून चालक विनोद उधवानी यांच्यासह कंत्राटदारावरही निष्काळजीपणा केल्याप्रकरणी कलम 196 सह कलम 279, 336 , 338, 304 अंतर्गत कांदिवली पोलिसांमध्ये गुन्हा दाखल केला आहे. तसेच ड्रेनेज साफसफाई करताना सुरक्षेच्या उपाययोजना न केल्यामुळे कंत्राटदार अजय शुक्ला याला अटक करण्यात आली आहे.