(अलिबाग)
ट्रेलर चोरीप्रकरणी पनवेल तालुका पोलिसानी दोन आरोपींना गजाआड केले असून त्यांच्याकडून चोरीचा ट्रेलर हस्तगत केला आहे. तालुक्यातील कोनगांव येथील नवकार कॉर्पोरेशन या ठिकाणी फिर्यादी यांनी उभा करून ठेवलेला टाटा कंपनीचा १८ चाकी ट्रेलर (एमएच ४६ एच ३९७७) हा चोरट्याने डुप्लिकेट चावीचा वापर करून चोरी करून नेल्याचा गुन्हा पनवेल तालुका पोलीस ठाणे येथे दाखल झाला होता.
पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि संजय गळवे, पो. हवालदार महेश घुमाळ, सुनील कुदळे, प्रकाश मेहेर, आकाश भगत आदींच्या पथकाने घटनास्थळापासून दुहेरी जाणाऱ्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा माग काढला.