(रत्नागिरी)
रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात पत्नीला उपचारासाठी घेउन आलेल्या वृध्दाचा छातीत दुखू लागल्याने अचानक मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. जनार्दन हरी हुंदळेकर (68, कारवली,राजापूर) असे मृत वृध्दाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जनार्दन हुंदळेकर यांचा पुतण्या रमेश शांताराम हुंदळेकर (40, कारवली, राजापूर) यांनी याची खबर दिली. त्यानूसार,जनार्दन हुंदळेकर सोमवार 30 मे रोजी दुपारी 1 वा.जिल्हा शासकिय रुग्णालयातील डोळ्यांच्या शस्त्रक्रीया शिबीरामध्ये पत्नी व पुतण्या रमेशसह आले होते.
तपासणी झाल्यानंतर रुग्णालयातील अपघात विभागासमोरील जागेत तिघेही जेवण्यासाठी बसले. त्यावेळी जनार्दन यांच्या छातीत दुखु लागले. त्यांच्या पत्नी आणि पुतण्याने त्यांना तातडीने अपघात विभागात दाखल केले. उपचारांदरम्यान त्यांचा सायंकाळी 6 वा.मृत्यू झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी घोषित केले.