( पावस )
रत्नागिरी तालुक्यातील डोर्ले येथे झाडावर चढून लाकडे तोडताना जमिनीवर कोसळलेल्या वृद्धाचा मुंबईत उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. एकनाथ शंकर शिवलकर (वय ७६) असे मृत वृद्धाचे नाव आहे. ही घटना ९ सप्टेंबर २०२२ सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घडली होती.
शिवलकर राहत्या घराजवळच्या झाडावर चढून लाकडे तोडत होते. यावेळी खाली पडून त्यांच्या मानेला व कंबरेला मुका मार लागला. उपचारासाठी प्रथम रत्नागिरीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर अधिक उपचारासाठी 11 जानेवारीला 2023 ला के.ई.एम हॉस्पिटल मुंबई येथे दाखल केले होते. २७ जानेवारीला त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी ६ फेब्रुवारीला पूर्णगड सागरी पोलिस ठाण्यामध्ये मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.