भारतीय जनसंघाचे संस्थापक नेते आपल्या सर्वांचे प्रेरणास्रोत डॉ. शामाप्रसाद मुखर्जी जयंती निमित्त संपूर्ण देशात भाजपा तर्फे सेवा सप्ताह सुरू आहे. या सेवा सप्ताह निमित्ताने चिपळूण तालुक्यात उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू यांच्या आदेशाने चिपळूण तालुका अध्यक्ष विनोद भोबस्कर यांच्या नेतृत्वाखाली अनेक उपक्रम सुरू आहेत.
पर्यावरण संवर्धनासाठी वृक्ष लागवड करणे गरजेचे आहे. म्हणून भारतीय जनता पार्टी चिपळूण तालुका अध्यक्ष विनोद भोबस्कर यांनी चिपळूण तालुक्यात ४,००० झाडे वृक्षारोपण करण्याचा संकल्प सोडला आहे. तशी सुरुवात सुध्दा त्यांनी केली आहे. नारदखेरकी, ओमळी, ताम्हणमळा या गावात जवळजवळ १५०० झाडांची लागवड करण्यात आली आहे.
हा सुंदर उपक्रम राबविण्यासाठी चिपळूण युवा मोर्चा उपाध्यक्ष प्रथमेशजी भोबस्कर, कळंबट शक्तीकेंद्र प्रमुख स्वप्निल जाधव, माजी उपसरपंच निलेश घडशी, अविनाश सावंत , रविंद्र जाधव, विशाल बांन्द्रे, सुनील जाधव, दिनेश कातकर, सहदेव घडशी, प्रदीप हुंबरे हे सहभागी झाले होते.