पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांचे स्मरणार्थ २९ ऑगस्ट हा दिवस ‘शेतकरी दिन’ म्हणून साजरा करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. यावर्षी ३० ऑगस्ट, २०२३ रोजी म्हणजेच नारळी पौर्णिमादिनी राज्यात ‘शेतकरी दिन’ साजरा करण्यात येणार आहे. दरवर्षी हा दिवस मराठी तिथीप्रमाणे शेतकरी दिन म्हणून साजरा करण्यात येईल.
पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या स्मरणार्थ यावर्षी ३० ऑगस्ट, २०२३ रोजी नारळी पौर्णिमेदिनी राज्यात #शेतकरी_दिन साजरा करण्यात येणार आहे. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. pic.twitter.com/qfiM2p0qjc
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) August 8, 2023
पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांनी शेतकऱ्यांकरिता केलेल्या कार्याचे स्मरण व्हावे व राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा सन्मान व्हावा म्हणून यावर्षी ३० ऑगस्ट, २०२३ या नारळी पौर्णिमेच्या दिवशी त्यांचा जन्म दिवस शेतकरी दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. शेतकरी दिन साजरा करण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना कृषी आयुक्तालयाने निर्गमित करण्यात येणार आहेत.