(रत्नागिरी)
डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठचे नवनिर्वाचित पदसिद्ध सदस्य श्री विनायक काशिद यांनी सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, झाडगाव, रत्नागिरी येथे भेट देवून, संशोधन केंद्राचा संशोधन, विस्तार शिक्षण यांचा आढावा घेतला. श्री विनायक काशिद, यांची डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ, दापोलीचे कार्यकारी मंडळ मध्ये पदसिद्ध सदस्य म्हणून नुकतीच महाराष्ट्रचे राज्यपाल महामहीम श्री. रेमेश बैस यांनी नियुक्ती केली होती. त्यानंतर त्यांनी विद्यापीठ मधील सर्व संशोधन केंद्र आणि महाविद्यालये यांची भेट घेवून आढावा घेणे सुरु केले.
दिनांक २६ डिसेंबर रोजी त्यांनी डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठच अंतर्गत झाडगाव, रत्नागिरी येथे असलेले सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, झाडगाव, रत्नागिरी येथे भेट दिली. यावेळी प्रथम सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी तर्फे संशोधन केंद्र प्रमुख व वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉ. आशिष मोहिते यांनी त्यांचे पुष्प गुच्छ देवून स्वागत केले. त्यानंतर त्यांनी संशोधन केंद्राचा इतिहास आणि सद्यस्थिती याबाबत माहिती सादर केली.
श्री विनायक काशिद, यांनी सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांचेशी संवाद साधला. त्यांनी संशोधन केंद्राच्या तथा विद्यापीठाचे नाव लौकिक वाढण्यासाठी कसोसीने काम करण्याचे आव्हाहन केले. बांधकाम बरोबरच इतरही सोवि-सुविधा जनक, विद्यार्थी आणि शेतकरी यांचे करिता सोयी यांसारखे प्रस्ताव सादर करण्याचे आव्हाहन केले. त्यांनी विद्यापीठाचे संशोधन कार्याची स्तुती केली आणि हे कार्य शेतकर्यापर्यंत पोहोचले पाहिजे अशी आशा केली. त्याकरिता विस्तार शिक्षण कार्यक्रम वाढविण्याचे आवाहन केले. त्यांनी शेतकर्यांकरिता जास्तीत जास्त आवश्यक विषयातील शिक्षण कार्यक्रम कार्यक्रम आयोजित करण्याचे सुचविले. संशोधन केंद्र आणि विद्यापीठ स्वावलंबी होण्याकरिता महसुली उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. सध्या जे प्रकल्प विद्यापीठ आथवा शासन स्तरावर प्रलंबित आहेत त्यांचा लेखी कागदपत्रांद्वारे पाठपुरावा करण्यास सांगितले. तसेच कुठे काम गरज असेल तिथे आपण मदत करण्यास सदैव तयार असल्याचे संबोधित केले.
शेवटी त्यांनी संशोधन केंद्राच्या ‘मत्स्यालय आणि संग्रहालयास भेट दिली आणि त्याची प्रशंसा देखील केली. या भेटी दरम्यान मत्स्य महाविद्यालय, शिरगाव चे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुरेश नाईक यांनी देखील उपस्थिती लावून चर्चेमध्ये विशेष सहभाग नोंदविला. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सचिन साटम (सहयोगी संशोधन अधिकारी) यांनी केले.
या सभेस संशोधन केंद्रातील डॉ. आसिफ पागरकर (प्राध्यापक), डॉ. हरिष धमगाये (सहयोगी प्राध्यापक), प्रा. नरेंद्र चोगले (सहयोगी संशोधन अधिकारी), डॉ. संतोष मेतर (अभिरक्षक), श्री. रमेश सावर्डेकर (वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक), सौ. जाई साळवी (वरिष्ठ लिपिक), श्री. सचिन पावसकर (लिपिक) हे हजार होते. सदर भेट कार्यक्रम पार पाडण्याकरिता संशोधन केंद्र प्रमुख व वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉ. आशिष मोहिते यांचे मार्गदर्शन खाली संशोधन केंद्रातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी विशेष मेहनत घेतली.