(जाकादेवी / संतोष पवार)
रत्नागिरी जिल्हा हौशी कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने मालगुंड पंचक्रोशी आयोजित डॉ. नानासाहेब मयेकर स्मृती चषकाचा मानकरी ठरला चिपळूण येथील वाघजाई कोळकेवाडी कबड्डी संघ तर उपविजेता ठरला मालगुंड येथील डॉ. नानासाहेब मयेकर फाउंडेशन कबड्डी संघ. या विजेत्या संघांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.
स्पर्धेत सन्मानित करण्यात आलेले संघ पुढीलप्रमाणे – विजेता संघ -वाघजाई कोळकेवाडी चिपळूण, उपविजेता डॉ.नानासाहेब मयेकर फाउंडेशन मालगुंड, तृतीय क्रमांक जुगाई कोसुंब संगमेश्वर, चतुर्थ क्रमांक महापुरुष रत्नागिरी, तसेच उत्कृष्ट पकड शुभम शिंदे (वाघजाई), उत्कृष्ट चढाई साईराज कुंभार (वाघजाई,)अष्टपैलू खेळाडू किरण जाधव (डॉ. नानासाहेब मयेकर फाउंडेशन इ.)
या स्पर्धेत जिल्ह्यातील नामांकित १६ संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेत अनेक दानशूर व क्रीडाप्रेमींनी उदारहस्ते उत्स्फूर्त देणग्या देऊन या स्पर्धेला चांगले योगदान दिले. यामध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षीस अभिषेक उर्फ भैय्या साळवी यांनी दिले. द्वितीय क्रमांकाचे बक्षीस निसर्ग व ऐश्वर्या चंद्रशेखर मयेकर यांच्याकडून देण्यात आले, तिस-या क्रमांकाचे बक्षीस हर्षवर्धन मयुरेश्वर पाटील यांच्याद्वारे तर चौथ्या क्रमांकाचे बक्षीस मानस दिनकर पवार यांनी दिले.
स्पर्धेसाठी लागणारी सर्व चषकं रामेश्वर ट्रॅव्हल्सचे सर्वेसर्वा किशोर गुरव यांनी उपलब्ध करून मोलाचे सहकार्य केले. या कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटक व बक्षीस समारंभाला मालगुंड गावच्या सरपंच सौ. श्वेता शेखर खेऊर, गणपतीपुळे देवस्थानचे सरपंच श्री विनायक राऊत, श्रीमती दिप्ती मयेकर, महेश उर्फ बाबू म्हाप, निसर्ग मयेकर, सहकार्यवाह महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे श्री रवींद्र देसाई,रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे खजिनदार- सदानंद जोशी, विनायक राऊत, किशोर पाटील, श्रीकांत मेहंदळे, शैलेश उर्फ बाबा मयेकर, रोहित मयेकर, भूषण मयेकर, ऋषिकेश मयेकर, तेजस हळदणकर, राहुल शिंदे, अभिषेक साळवी, अमित पाटील, अतुल पाटील यांसह अनेक मान्यवर, क्रीडाप्रेमी, देणगीदार, हितचिंतक उपस्थित होते.
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी गावातील सर्व संघातील कबड्डी खेळाडू, डॉ.नानांचे हितचिंतक, मंगलमूर्ती क्रीडा मंडळ मालगुंड व डॉ.नानासाहेब मयेकर फाउंडेशन यांनी विशेष मेहनत घेऊन या स्पर्धा यशस्वी केल्या. या सर्व सहभागी संघ, देणगीदार, पंच, रसिक, क्रिडाप्रेमी या सर्वांचे डॉ नानासाहेब मयेकर फाऊंडेशनचे कार्याध्यक्ष, युवा नेते रोहित मयेकर, बाबा मयेकर यांनी अभिनंदन करून आभार व्यक्त केले