(जाकादेवी/संतोष पवार)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचारमंच महाराष्ट्र -रत्नागिरी, नागपूर,चंद्रपूर जिल्हा कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने D.B.A.चा द्वितीय वर्धापन दिन आणि राज्यस्तरीय कविसंमेलनडॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन उरूवेला नागपूर येथे युवा उद्योजक व D.B.A चे कोकण विभागीय अध्यक्ष विनोद जाधव यांच्या अध्यक्षतेखाल संपन्न झाले. प्रमुख अतिथी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व महामानवाच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून त्रिसरण पंचशीलाने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भिमराव यशवंतराव आंबेडकर यांनी कार्यक्रमाला भ्रमणध्वनी वरून थेट शुभेच्छा देऊन D.B.A.च्या कार्याचे विशेष कौतुक केले. त्यानंतर D.B.A. निर्मित साहित्यधारा इतिहासाचे पर्व नवे या You tube channel प्रदर्शित करण्यात आले. तर D.B.A.संस्थापक अध्यक्ष मनोज जाधव यांच्या लेखणीतून साकारलेले भीमपर्वहे भीम गीत प्रदर्शित करण्यात आले.
चंद्रपूर जिल्हाच्या प्रतिभावंत कवयित्री D.B.A.जिल्हाध्यक्षा आणि कार्यक्रमाच्या स्वागताध्यक्षा भावना खोब्रागडे यांच्या सुमधुर आवाजात स्वागत गीत सादर करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमाला उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष विनोद जाधव यांचा सन्मानचिन्ह, शाल मानाचा पट्टा व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर अनिरुद्ध शेवाळे, संघमित्रा गेडाम, राहुल परूळकर, अध्यक्ष बा.ना. ई.सुभाष मानवटकर, संस्थापक अध्यक्ष मनोज जाधव विशेष करून तेलांगानामधून उपस्थित असणाऱ्या जोत्स्ना मोरे यांचा नागपूर व चंद्रपूर जिल्हा कमिटीच्या पदाधिकारी यांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आला.
संपूर्ण कार्यक्रमाचे प्रास्ताविक व D.B.A. करत असलेले काम याचा लेखाजोखा संस्थापक -अध्यक्ष मनोज जाधव यांनी प्रास्ताविक मधून व्यक्त कला. त्यानंतर D.B.A.निर्मित महाराष्ट्रातील ११८ कवींच्या कविताचा समावेश असणाऱ्या भीमपर्व या प्रातिनिधिक काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. त्याच बरोबर महाराष्ट्रातील १३ कवींचे काव्यसंग्रह प्रकाशित करण्यात आले.
यावेळी कवींना डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्नाने गौरविण्यात आले. १० मान्यवरांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार व साहित्यरत्न पुरस्कार देवून गौरविण्यात आले.अनिरुध्द शेवाळे कवी,लेखक, सिनेमा कलावंत, प्रबोधनकार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना D.B.A.ने राबविलेल्या या नावीन्यपूर्ण उपक्रम बद्दल आयोजकांचे विशेष आभार मानले. या ऐतिहासिक कार्यक्रमाचा मी साक्षीदार झाल्याने धन्य झालो असे गौरवउद्गगार काढले.
तेलंगणातील प्रसिद्ध कवयित्री जोत्स्ना मोरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाध्यक्ष विनोद जाधव यांनी प्रथमतः नागपूर व चंद्रपूर जिल्हा कमिटीचे व विशेषतः भावना खोब्रागडे चंद्रपूर जिल्हाध्यक्षा आणि अर्चना चव्हाण नागपूर जिल्हा सचिव याचे मनापासून आभार व्यक्त केले. खरतंर दिक्षाभूमीच्या सानिध्यात संपन्न झालेल्या या शानदार सोहळ्याने मी भारावून गेलो आहे. या D.B.A.च्या पुढील वाटचालीस मी तुमच्या सोबत सदैव आहे. त्यामुळे D.B.A.ची भावीवाटचाल नक्कीच प्रेरणादायी असेल यांत शंकाच नाही. सर्व पुरस्कार प्राप्त मान्यवर, उपस्थित कवी व ज्याची पुस्तके प्रकाशित झाली ,अशा कवीना मंगलमय शुभेच्छा दिल्या.
सकाळ सत्रातील संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन संदेश सावंत रत्नागिरी, नरेंद्र पवार ठाणे- मुंबई, प्रितीबाला बोरकर नागपूर यानी केले. तर दुपार सत्रात राज्यस्तरीय कविसंमेलनाला सुरूवात झाली. कविसंमेलनाध्य शलिक जिल्हेकर नागपूर यांचा शाल, सन्मानचिन्ह ,पुष्पगुच्छ देऊन मनोज जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यानंतर स्वागताध्यक्ष भावना खोब्रागडे यांनी कविसंमेलनाचे शुभारंभ गीत सादर करून कवींमध्ये चैतन्य निर्माण केले.सदर कविसंमेलनात निमंत्रित ५० कवींनी आपल्या बहारदार कवितांचे सादरीकरण करून कविसंमेलनाची रंगत वाढवली.
फोटो – नागपूर येथील कविसंमेलनात कवींचा सत्कार करताना मंचाचे अध्यक्ष मनोज जाधव सोबत विनोद जाधव, साहित्यिक, कवी व मान्यवर