रत्नागिरी : डॉक्टर्स दिनाचे औचित्य साधून राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी रत्नागिरी शहर च्या माध्यमातून, रत्नागिरी शासकीय रुग्णालयातील व शहरातील खाजगी वैद्यकीय सेवा देणारे डॉक्टर्स यांचा सत्कार करण्यात आला. गेले दीड वर्ष जगात कोरोनाने थैमान घातलेले असताना अनेक रुग्ण मृत्युमुखी पडत असताना, स्वतः च्या जीवाची पर्वा न करता जगातील अनेक डॉक्टर्स या रुग्णांची सेवा करून रुग्णांना बरे करायचा प्रयत्न करत आहेत. या काळात डॉक्टरांवर अनेक प्रकारचे ताण असतात. याही परिस्थितीत आपला सेवाधर्म जाणून अनेक डॉक्टर्स सेवा देत आहेत.
या प्रसंगी जेष्ठ नेते कुमार शेट्ये, जिल्हा सरचिटणीस सचिन कोतवडेकर, शहराध्यक्ष निलेश भोसले, डॉक्टर्स सेलचे डॉ. सुर्वे, युवक चिटणीस बंटी वणजु, उपाध्यक्ष सनीफ गवाणकर, सरचिटणीस रणजीत शिर्के,यशवंत डोर्लेकर,पप्पू तोडणकर,पावस विभाग अध्यक्ष सज्जन लाड, विद्यार्थी तालुकाध्यक्ष सूरज शेट्ये, शहराध्यक्ष साई शीवलकर,समीर भोसले,चिटणीस प्रथमेश कांबळे, सौरभ वायंगणकर, अक्षय माजगावकर. प्रल्हाद शिंदे, संतोष पाटोळे उपस्थित होते.