(रत्नागिरी)
प्राण्यांच्या दवाखान्यात आपल्या गुगल पे अकाउंटवर सुमारे ४ लाख १२ हजार १७२ रुपयांची फसवणूक करणाऱ्या दोन महिलांच्या पोलिस कोठडीत न्यायालयाने ३ दिवसांची वाढ केली. यापूर्वी त्यांना ४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती.
रेणुका बबन गिजे ( २६, रा. के. सी. जैननगर , रत्नागिरी ) आणि दिशा दिनेश सुर्वे ( २८, रा . शांतीनगर , रत्नागिरी ) अशी पोलिस कोठडीत वाढ करण्यात आलेल्या संशयित महिलांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात डॉ. अविनाश भागवत ( ४८ , रा. टिळक आळी रत्नागिरी ) यांनी शनिवारी पोलिसांकडे तक्रार दिली होती.
डॉ. भागवत यांचे साळवी स्टॉप येथे पेट्स गॅलरी नावाचे दुकान आहे. त्यात या दोन संशयित महिला कामाला होत्या. त्यांनी डॉक्टर भागवत यांची परवानगी न घेताच गुगल पे अकाउंटवर शॉपच्या व्यवहाराची रक्कम स्वीकारून त्यांची फसवणूक केली होती.