ऑस्ट्रेलियाचा महान फलंदाज डेव्हिड वॉर्नरने चालू विश्वचषकात सलग दुसरे शतक झळकावले. त्याने बुधवारी (25 ऑक्टोबर) दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर नेदरलँड्सविरुद्ध 104 धावांची शानदार खेळी खेळली. वॉर्नरने 93 चेंडूंच्या खेळीत 11 चौकार आणि तीन षटकार ठोकले. विश्वचषकाच्या इतिहासातील हे त्याचे सहावे शतक आहे.
डेव्हिड वॉर्नरच्या वनडे कारकिर्दीतील हे 22 वे शतक आहे. यासह, तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 22 शतके झळकावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तिसऱ्या स्थानावर आला आहे. वॉर्नरने 153 डावांमध्ये ही कामगिरी केली आहे. त्याने या यादीत दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज एबी डिव्हिलियर्स आणि भारतीय कर्णधार रोहित शर्माला मागे टाकले आहे.
सर्वात जलद 22 एकदिवसीय शतके झळकावणारे फलंदाज
126 डाव – हाशिम आमला
143 डाव – विराट कोहली
153 डाव – डेव्हिड वॉर्नर*
186 डाव – एबी डिव्हिलियर्स
188 डाव – रोहित शर्मा
डिव्हिलियर्सने 186 डावांमध्ये तर रोहित शर्माने 188 डावांमध्ये ही कामगिरी केली आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 22 शतके करण्याचा विक्रम दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज खेळाडू हाशिम अमलाच्या नावावर आहे. आमलाने 126 डावात ही कामगिरी केली होती. या यादीत दुसरे नाव विराट कोहलीचे आहे. कोहलीने 143 डावात हा विक्रम केला आहे.