(नवी दिल्ली)
भारतीय हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांची जागतिक हवामान संघटनेचे उपाध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. डब्ल्यूएमओने याबाबत ट्विट केले आहे. तर आयर्लंडमधील मेट इरिअनचे संचालक इओन मोरान आणि कोट डी आयव्हॉरचे हवामानशास्त्र संचालक दौडा कोनाटे या दोघांनादेखील डब्ल्यूएमच्या उपाध्यक्षपदी पदोन्नती देण्यात आली
मृत्युंजय महापात्रा, मूळचे ओडिशाचे, भारताचे ‘सायक्लोन मॅन’ म्हणून ओळखले जातात. मृत्युंजय महापात्रा यांना या पदासाठी झालेल्या निवडणुकीत एकूण १४८ मतांपैकी ११३ मते मिळाली. ते २०१९ पासून देशातील सर्वोच्च हवामान कार्यालयाचे प्रमुख आहेत.
जागतिक हवामान संघटना (WMO) ही 1950 मध्ये स्थापन झालेली संस्था आहे. WMO जागतिक हवामान स्थितीवर वार्षिक अहवाल जारी करते. हा अहवाल हवामानातील घडामोडी तसेच स्थानिक, राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावरील तापमानाची संपूर्ण माहिती प्रदान करते. याशिवाय, टोळांच्या थवाविषयी अंदाज वर्तवणं ही WMO ची आणखी एक जबाबदारी आहे. भारत 1949 पासून WMO चा सदस्य आहे. चक्रीवादळ अम्फानच्या अंदाज आणि अद्यतनांमध्ये उल्लेखनीय अचूकतेबद्दल भारताच्या IMD ची WMO नं देखील प्रशंसा केली होती.