(रत्नागिरी)
मुंबई-गोवा महामार्गावर झरेवाडी टॉवर ते चरवेली उतारावरील वळणावर ट्रकने समोरून येणाऱ्या दुचाकीला ठोकर दिली. या अपघातात स्वाराचा मृत्यू झाला. या प्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तौफिक हानिफ खान (वय ४१, रा. पाटुका सहसौला, ता. तावरू, जि. मेवात, राज्य हरियाणा) असे त्याचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. ११) सायंकाळी पावणेआठच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावर हातखंबा झरेवाडी टॉवर ते चरवेली गावच्या उतारातील उजव्या वळणावर घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित खान हे ट्रक (एचआर ५५, यु १४७९) घेऊन मुंबई-गोवा रस्त्यावर चरवेली उतारावरून जात असताना समोरून गोवा ते मुंबईकडे जाणाऱ्या दुचाकीला (एमएच-४६ एडब्ल्यू ६५८०) ठोकर दिली. यामध्ये स्वार राहुल सुरेश आव्हाड (रा. पनवेल) यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी सहायक पोलिस फौजदार मोहन कांबळे यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयित ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ग्रामीण पोलिस अमलदार करत आहेत.