(मुंबई)
ठाणे घोडबंदर रोड वर रिक्षा डिव्हायडरला आदळून पेटल्याचा भयंकर घटना आलीआहे. दरम्यान या अपघातानंतर महिला प्रवासीचा मृत्यू झाला असून रिक्षा चालक जखमी झाला आहे. ही घटना गायमुख भागातील असून पहाटे 5.45च्या सुमाराची ही घटना आहे.
PTI वृत्त संस्थेच्या माहितीनुसार, ऑटोरिक्षा ठाणे शहराकडून भायंदरकडे जात असताना रिक्षा चालकाचा वाहनावरील कंट्रोल सुटला. त्यानंतर रिक्षा नियंत्रणाबाहेर गेल्याने थेट डिव्हायडर वर आदळली. त्यानंतर रिक्षाने पेट घेतला. या रिक्षा अपघातामध्ये महिला पॅसेंजर आत अडकली. पेटलेल्या रिक्षातच तिचा जळून मृत्यू झाला. ड्रायव्हरचं नाव राजेश कुमार यादव आहे. 45 वर्षीय राजेशला काही ठिकाणी भाजले आहे. मात्र रिक्षा जळून खाक झाली आहे.
दरम्यान रिक्षा पेटल्याच्या घटनेनंतर स्थानिक फायरमॅन आणि RDMC team घटनास्थळी धावून आली. त्यामध्ये 30 मिनिटांचा वेळ गेला. त्यानंतर ड्रायव्हरला हॉस्पिटल मध्ये नेण्यात आलं. त्याच्यावर उपचार सुरू आहेत अशी माहिती येथील अधिकार्यांनी दिली.