(ठाणे)
ठाण्याच्या मुंब्रा दिवा खाडीत स्फोटकं साडल्याने खळबळ उडाली आहे. ठाणे जिल्हाधिका-यांच्या छाप्यानंतर स्फोटक साहित्य जप्त करण्यात आली आहेत. मुंब्रा येथील उल्हास नदीत एका बार्जमधून स्फोटकं जप्त करण्यात आली आहेत. जप्त केलेली स्फोटकं कळवा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली आहेत.
तपासादरम्यान 17 डिटोनेटर्स आणि 16 जिलेटिनच्या कांड्या जप्त करण्यात आल्या आहेत. दिवा भागात सक्शन पंप वापरून अवैधरित्या रेती उत्खनन सुरू असल्याची माहिती स्थानिक मच्छीमारानी दिली होती. त्या अनुषंगाने जिल्हाधिका-यांच्या विशेष पथकाने त्या ठिकाणी धाड टातली. या छाप्यात १७ डिटोनेटर्स आणि १६ जिलेटिनच्या कांड्या जप्त करण्यात आल्या आहेत. दिवा भागात सक्शन पंप वापरून अवैधरित्या रेती उत्खनन सुरू असल्याची माहिती स्थानिक मच्छीमारानी दिली होती. त्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांच्या विशेष पथकाने त्या ठिकाणी धाड टाकली.
ठाण्यात खाडी परिसरात अवैधपणे रेती उपसा केला जात असून महसूल प्रशासनाकडून या रेती उपशांवर वारंवार धाडी टाकल्या जात आहेत. तहसीलदार युवराज बांगर यांच्या पथकान मुंब्रा खाडी पात्रात उतरून उपसा सुरू असलेल्या ठिकाणी धाडी मारल्या होत्या. पथकाने सर्व साहित्य आणि बोटीही जप्त केल्या होत्या. यात अंदाजे दीड कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. अशाच प्रकारची कारवाई महसुल विभागाकडून मंगळवारीही सुरू होती.