(रत्नागिरी)
गेली अनेक दिवस रत्नागिरी बस स्थानकातून दुपारी 12.30 वाजता सुटणारी रत्नागिरी (चांदेराई) कुरतडे ही बस सेवा गेले काही दिवस बंद होती. याचा परिणाम सकाळ सत्रात शिकणारे शालेय तथा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवर होत होता. ग्रामपंचायत मार्फत तथा वैयक्तिक अर्ज देवून सुद्धा रत्नागिरी आगारामार्फत बस सेवा चालू केली जात नव्हती. यामुळे त्रस्थ झालेल्या विद्यार्थ्यांनी अखेर खासदार श्री.विनायकजी राऊत यांच्या कार्यालयाला भेट देवून आपली व्यथा मांडली. त्यांना तात्काळ प्रतिसाद देत खासदार श्री.विनायक राऊत यांचे स्विय सहाय्यक श्री.सूर्यकांत तांबे तथा शिवसेना शहर संघटक व युवासेना तालुकाधिकारी श्री.प्रसाद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली समाजसेविका वृंदा बोरकर यांच्या समवेत विद्यार्थ्यांनी रत्नागिरी आगारप्रमुख तसेच आगार नियंत्रकांची भेट घेवून त्यांना निवेदन दिले.
या निवेदनावर तत्काळ आगार नियंत्रक अधिकारी श्री.महेश सावंत व सौ. प्रभुणे मॅडम यांनी योग्य ती कारवाई करून लगेचच रत्नागिरी कुरतडे ही बस चालू केली. व आश्वासन दिले की, यापुढे रत्नागिरी कुरतडे ही बस अविरत चालू राहील.यावर रत्नागिरी, टेंबे व चंदेराई येथे शिकणाऱ्या शालेय तथा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आगार व्यवस्थापनाचे व खासदार श्री.विनायक राऊत यांचे स्वीय सहाय्यक श्री.सूर्यकांत तांबे, शहर संघटक श्री. प्रसाद सावंत, समाजसेविका सौ. वृंदा बोरकर, श्री.पारस पाटील यांचे आभार मानले.