(वाराणसी)
टोमॅटोचे भाव वाढल्यानंतर उत्तर प्रदेशच्या वाराणशीतील एका टोमॅटो विक्रेत्याने अजब शक्कल लढवली आहे. त्याने टोमॅटो चोरीला जाऊ नये म्हणून टपरीवर चक्क बाउन्सरची टीम तैनात केली आहे. अजय फौजी असे या टोमॅटो विक्रेत्याचे नाव आहे. या प्रकारामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. बाउन्सर नेमण्याच्या निर्णयाबद्दल अजय फौजी म्हणाला की, ‘टोमॅटोचे भाव खूप वाढले असल्याने मी टपरीवर बाउन्सर ठेवले आहेत. लोक संतप्त आहेत आणि टोमॅटोची लूटमारही करत आहेत. आमच्या टपरीवर टोमॅटो असल्याने काहीही घडू शकते. आम्हाला वाद नको आहे. त्यामुळे मी बाउन्सर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. टोमॅटोचा भाव येथे सध्या प्रति किलो १६० रुपयांवर पोहोचला आहे.