(आरोग्य)
टोमॅटोचा वापर प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात केला जातो. टोमॅटोचा वापर आपण भाजी तसेच सॅलडही म्हणून करतो. त्याच वेळी, आपल्याला सर्व हंगामात टोमॅटो सहज मिळतात. कॅल्शियम, व्हिटॅमिन सी, फॉस्फरस इत्यादी आरोग्यासाठी आवश्यक पोषक घटक टोमॅटोत आढळतात. त्यात अँटी-ऑक्सिडेंट, अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म देखील आहेत जे शरीराला रोगांशी लढण्यासाठी मजबूत करतात.
टोमॅटो बारामाही उपलब्ध असल्याने याचे मोठ्या प्रमाणात सेवन केले जाते. टोमॅटो कुठल्याही सीझनमध्ये आपणास सहज रित्या मिळून जातो. टोमॅटो चवीला तर चांगला असतोच शिवाय त्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म देखील असतात. टोमॅटोमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस यासारखे खनिज पदार्थ तसेच विटामिन मोठ्या प्रमाणात आढळतात.
टोमॅटोचे सलाद तसेच भाजी, सूप इत्यादी स्वरूपात याचे सेवन केले जाते. टोमॅटो चे सेवन केल्याने शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता वाढते शिवाय यामुळे डोळ्यांचे आरोग्य देखील सुधारते, तसेच टोमॅटोचे नियमित सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होते. टोमॅटोची जरी आपल्या शरीराला अनेक आश्चर्यकारक फायदे होत असले तरी काही लोकांनी टोमॅटोचे सेवन करणे टाळले पाहिजे. कोणत्या लोकांनी टोमॅटोचे सेवन करणे टाळावे आणि यापासून कोणत्या समस्यांना अशा लोकांना सामोरे जावे लागू शकते याची आपण माहिती घेऊ
आरोग्यासाठी तुम्ही रोज टोमॅटो खात असाल व तो चुकीच्या पद्धतीने सेवन केल्यास तुमच्या शरीराला हानी पोहोचू शकते. अनेकवेळा टोमॅटो स्वस्त दराने मिळतात, त्यामुळे आपण ते सहज एक-दोन खात असतो. मात्र असे अनेक आजार आहेत, ज्यांच्या रुग्णांनी टोमॅटोचे सेवन केल्यास ते त्यांच्यासाठी फायदेशीर ठरत नाही.
या लोकांनी टोमॅटोचे सेवन कदापि करू नये
किडनी स्टोनची समस्या
जर तुम्हाला किडनीचा आजार असेल तर टोमॅटोचे सेवन अजिबात करू नका. अनेक संशोधनात असे आढळून आले आहे की टोमॅटोचे जास्त सेवन केल्याने किडनी स्टोनचा धोका वाढतो. टोमॅटोमध्ये कॅल्शियम ऑक्साईड असते, ज्यामुळे किडनी स्टोनचा धोका वाढतो. कॅल्शियम ऑक्साईडमुळे 90% लोकांना किडनी स्टोनची समस्या असते. त्यामुळे जेव्हा तुम्हाला किडनी स्टोनची लक्षणे दिसतात तेव्हा तुम्ही टोमॅटोचे सेवन पूर्णपणे बंद करावे.
सांधेदुखी
जर तुम्हाला सांधेदुखीचा त्रास होत असेल तर टोमॅटोचे सेवन हानिकारक ठरू शकते. ज्यांना सांधे दुखत असतील त्यांनी टोमॅटोचे सेवन करू नये कारण यामुळे तुमची समस्या वाढू शकते. त्यामुळे सूज आणि सांधेदुखीचा त्रासही होऊ शकतो.
डायरिया
डायरियाची समस्या असल्यास टोमॅटोचे सेवन न करण्याचा सल्ला दिला जातो. जुलाब होत असल्यास टोमॅटोच्या सेवनाने तुमची समस्या आणखी वाढू शकते. टोमॅटोमध्ये साल्मोनेला नावाचे बॅक्टेरिया असते ज्यामुळे डायरियाची समस्या वाढते. त्यामुळे टोमॅटोचे सेवन करू नये.
पचनाशी संबंधित समस्या
टोमॅटोमुळे कधीकधी पचनाशी संबंधित समस्या उद्भवतात. ज्यामुळे अॅसिडिटी होते. टोमॅटो जास्त खाल्ल्यास अॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो. यामुळे, तुम्हाला छातीत जळजळ होऊ शकते आणि जर तुम्ही ते जास्त प्रमाणात सेवन केले तर तुम्हाला पोटदुखी आणि गॅसची समस्या देखील होऊ शकते. ज्यांना सतत गॅसचा त्रास होत असेल त्यांनी टोमॅटोचे सेवन सोडून द्यावे.
एलर्जी असलेल्या लोकांनी
ज्या लोकांना कुठली ना कुठली ऍलर्जी असते अशा लोकांनी याचे सेवन करू नये. अनेकदा असे होते की टोमॅटोचे अधिक सेवन केल्याने स्किन एलर्जी, रेसेस, चेहऱ्यावर सूज येणे अशा समस्या घर करू लागतात म्हणून आधीच एलर्जी असलेल्या लोकांनी तर मुळीच टोमॅटोचे सेवन करू नये.
इतर
टोमॅटो कितीही गुणकारी आणि आरोग्यवर्धक असला तरी देखील संधिवात, अम्लपित्त, सूज, आमवात इ. सारखे विकार ज्यांना असतील त्यांनी शक्यतो टोमॅटो खाऊ नयेत. ज्यांच्या अंगात अधिक उष्णता असेल आणि आंबट पदार्थ खाल्याने त्रास होत असेल, अशानीही टोमॅटो खाऊ नये. ज्यांना सतत पोट बिघडणे किंवा जुलाब होणे असा त्रास होत असेल त्यांनीही आपल्या आहारात टोमॅटो कमीत कमी प्रमाणात ठेवावेत.