(चिपळूण / ओंकार रेळेकर)
चिपळूण तालुक्यातील दसपटी विभागातील टेरव मधील राधाकृष्ण वाडीमधील ज्येष्ठ नागरिक श्री. धोंडजीराव सखारामराव कदम, कुशल शेतकरी व मा. पोलीस पाटील यांचे कनिष्ठ सुपुत्र श्री. प्रकाशराव कदम हे महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत आहेत. सन २०१३ साली पोलीस उपनिरीक्षक विभागीय अहर्तता परीक्षा महाराष्ट्रात घेण्यात आली होती. सदर परीक्षेत श्री प्रकाशराव कदम हे प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले होते. त्यांची पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती झाली असुन त्यांनी ठाणे नगर पोलीस ठाणे येथे पोलीस उपनिरीक्षक पदाचा नुकताच पदभार स्वीकारला. सदर प्रसंगी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जयराज रणवरे साहेब व पोलिस निरीक्षक (प्रशा.) श्रीमती विद्या पाटील मॅडम व इतर अधिकारी आणि अंमलदार उपस्थित होते.
श्री. प्रकाशराव हे अत्यंत प्रामाणिक अधिकारी असून, त्यांनी अनेक गुन्ह्यांची उकल केली आहे, तसेच पोलिस खात्यात एक उत्तम तपास व कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्यांना अनेक बक्षिसे तसेच प्रशस्तीपत्रे प्राप्त झाली आहेत. तसेच सन २०१६ साली त्यांना पोलीस महासंचालक यांच सन्मानचिन्ह (पोलीस पदक) मिळाले आहे.
श्री प्रकाशराव यांना अथक प्रयत्नांनी मिळविलेल्या पोलीस उपनिरीक्षक पदोन्नती बद्दल समस्त नातेवाईक, दसपटकर, टेरव ग्रामस्थ, मित्रमंडळी तसचे अनेक सामाजिक संस्था यांनी त्यांचे अभिनंदन करून आनंद व्यक्त केला आहे.