(संगलट (खेड) /इक्बाल जमादार)
एका २० वर्षीय टेम्पो चालकाची हत्या करून त्याचा मृतदेह रेल्वे रुळानजीक असलेल्या एका झाडाच्या फांदीला लटकावून आरोपी फरार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना भिवंडी तालुक्यातील ताडाली गावाच्या हद्दीतील रेल्वे रूळा नजीकच्या झाडावर घडली आहे. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. सद्दाम कुरेशी (२०, रा. कामतघर भिवंडी ) असे हत्या झालेल्या चालकाचं नाव आहे. मृतक चालक सद्दाम भिवंडी शहरातील कमतघर भागात कुटूंबासह रहात होता
आरोपीचा तपास सुरू
यासंदर्भात तपास अधिकारी पोलीस निरीक्षक (गुन्हे) समाधान चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता, बुधवारी रात्रीच्या सुमारास चालक सद्दाम याला मारहाण करून रेल्वे रूळा नजीक असलेल्या एका झाडा त्याचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत अनोखळी आरोपी फरार झाला. आरोपीचा शोध घेण्यासाठी दोन पोलीस पथक रवाना केले असून लकवरच आरोपीला अटक करू असे त्यांनी सांगितले.
सद्दाम हा एका टेम्पोच्या मालकाकडे चालक म्हणून काम करत होता. त्यातच नेहमीप्रमाणे बुधवारी ८ नोव्हेंबर रोजी सद्दाम हा टेम्पो घेऊन ठाणे शहरात गेला होता. त्यानंतर रात्रीच्या सुमारास परत येत असताना रात्री १० च्या सुमारास भिवंडी रेल्वे स्थानकाहून ताडाली मार्गे येत असताना कोणी तरी अज्ञात आरोपीने त्याला ताडाली गावच्या हद्दीत असलेल्या रेल्वे रुळानजीक मारहाण करून येथील एका झाडाला फास लावून त्याचा मृतदेह लटकवून आरोपी फरार झाला. दरम्यान, या घटनेची माहिती नारपोली पोलीस पथकाला मिळताच घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. याप्रकरणी ताडाली गावात राहणार्या एका शेतकर्याच्या या तक्रारीवरून अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला आहे.