(रत्नागिरी)
टेंभ्ये गावचे ग्रामदैवत श्री भैरी जुगाईची पालखी मिरवणूक श्री देव भैरीच्या भेटीला उद्या रविवार दिनांक ०६/०३/२०२३ रोजी दुपारी ०१.०० वाजता श्री सिध्देश्वर मंदिर येथुन ढोल ताशांच्या गजरात प्रतिवर्षाच्या मिरवणुक मार्गावरुन जाणार आहे. हा मार्ग मारुती मंदिर येथे ०४.०० वाजता, एसटी स्टँन्ड ०५.०० वाजता, मारुती आळी, गोखलेनाका ०६.३० वाजता, मुरलीधर मंदिर, खालची आळी मार्गे गोखलेनाका, रामनाका, धनजीनाका मार्गे सीटी पोलीस स्टेशन तेथून धनजीनाका, गवळीवाडा, हेडक्वार्टर महापुरुष मंदिर येथून माळनाका व माळनाका येथुन टेंभ्ये येथे येईल.
सर्व भाविकांना कळविण्यात येते की, यावर्षी पौर्णिमा सायंकाळी ०६.१० पर्यंत असल्याने होळी सायंकाळी ०६.०० नंतर उभी राहील. त्यानंतर गाऱ्हाने व ओटया भरण्याचा कार्यक्रम होईल. तरी सर्व भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे श्री भैरीजुगाई वरदायीनी भराडीन देवस्थान टेंभ्येच्यावतीने कळविण्यात आले आहे.