(क्रीडा)
२०२३ वर्षांची सुरुवात जानेवारीमध्ये श्रीलंकेविरुद्ध भारत टी-२० आणि एकदिवसीय मालिका खेळून होणार आहे. या सामन्यांसाठी नुकताच बीसीसीआयने संघ जाहीर केला. यावेळी टी-२० संघाचे कर्णधारपद हार्दिक पांड्या याच्याकडे दिले गेले असून एकदिवसीय संघाची धुरा रोहित शर्माकडे दिली आहे.
विशेष म्हणजे सूर्यकुमार यादव याला टी-२० संघाचा उपकर्णदार केले असून ब-याच युवा खेळाडूंना टी-२० संघात संधी दिली गेली आहे. याशिवाय रोहितसह विराट, श्रेयस अय्यर, केएल राहुल हे दिग्गज टी-२० संघात नसून एकदिवसीय संघात आहेत. तर ऋषभ पंत हा दोन्ही संघात नसल्याचे दिसून येत आहे.
भारताचा टी-२० संघ
हार्दिक पांड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), ईशान किशन (विकेटकिपर), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, संजू सॅमसन, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, हर्षल पटेल, उमरान मलिक, शिवम मावी, मुकेश कुमार