(इंदूर)
भारताने न्यूझीलंडचा धावांनी पराभव करत मालिका 3 – 0 अशी जिंकली.
टीम इंडियाने न्यूझीलंडला विजयासाठी 386 धावांचे आव्हान दिले होते. मात्र भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडला 295 धावांवरच ऑलआऊट केलं. भारताच्या 386 धावांचा पाठलाग करताना डेवॉन कॉन्वेच्या झुंजार 136 धावांच्या जोरावर किवींनी कडवी झुंज दिली. मात्र न्यूझीलंडला 41.2 षटकात 295 धावांमध्ये गुंडाळले. शार्दुल ठाकूरने किवींना पाठोपाठ धक्के देत भारताला विजयपथावर आणले.
शार्दुल आणि कुलदीपने प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तर फलंदाजीत रोहित शर्माने 101 तर शुबमन गिलने 112 धावांची शतकी खेळी केली. हार्दिकनेही 54 धावांचे योगदान देत भारताला 385 धावांपर्यंत पोहचवले. भारताने न्यूझीलंडविरूद्धची मालिका 3 – 0 अशी जिंकत आयसीसी वनडे रँकिंगमध्ये अव्वल स्थान पटकावले.
भारताचे 386 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या किवींना दुसऱ्याच षटकात हार्दिक पांड्याने पहिला धक्का दिला. मात्र डेवॉन कॉन्वे आणि हेन्री निकोल्स यांनी किवींचा डाव सावरत दुसऱ्या विकेटसाठी 106 धावांची शतकी भागीदारी रचली.
ही जोडीन अखेर कुलदीप यादवने निकोल्सला 42 धावांवर बाद करत फोडली. मात्र हेन्री निकोल्स बाद झाल्यानंतर सलामीवीर डेवॉन कॉन्वेने किवींच्या डावाची सूत्रे आपल्या हातात घेतली. त्याने 71 चेंडूत शतकी खेळी करत न्यूझीलंडला 24 षटकात 175 धावांपर्यंत पोहचवले.
मात्र शार्दुल ठाकूरने 26 व्या षटकात डॅरेल मिचेल (24) आणि टॉम लॅथम यांना पाठोपाठच्या चेंडूवर बाद करत किवींचा झंजावात रोखण्याचा प्रयत्न केला. शार्दुलनेच 28 व्या षटकात ग्लेन फिलिप्सला 5 धावांवर बाद करत किवींची अवस्था 5 बाद 200 धावा अशी केली.
शार्दुलने जरी किवींना पाठोपाठ धक्के दिले असले तरी शतकवीर डेवॉन कॉन्वे मात्र एकाकी झुंज देत होता. मात्र अखेर उमरान मलिकने त्याचा अडसर दूर केला. कॉन्वेने 100 चेंडूत 138 धावांची तुफानी खेळी केली. यानंतर मायकल ब्रेसवेलने 26 धावा करत थोडाफार प्रतिकार केला. मात्र भारताने किवींना 295 धावात गुंडाळत व्हाईट वॉश दिला.
दरम्यान या विजयासह टीम इंडियाने न्यूझीलंडला 3-0 च्या फरकाने क्लीन स्वीप केलं आहे. तसेच टीम इंडियाने आयसीसी वनडे रँकिंगमध्ये अव्वल स्थानी झेप घेतली.
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, वॉशिंगटन सुंदर, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल आणि उमरान मलिक.
न्यूझीलंड प्लेइंग इलेव्हन : फिन एलन, डेवन कॉनवे, हेनरी निकल्स, डॅरेल मिचेल, टॉम लॅथम, ग्लेन फिलिप्स, मायकल ब्रेसवेल, मिचेल सँटनर, जॅकब डफी, ब्लेयर टकनर आणि लॉकी फर्ग्यूसन.