(प्रतिनिधी/ खेड)
मे महिन्यात झाडावर चढून आंबे काढताना पाय घसरून पडल्याने खेड येथील एका वृध्दाचा उपचारादरम्यान मुंबई येथे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दत्ताराम शंकर उतेकर (59, डोंबिवली, मूळ पुरे खुर्द, शिंगरी, खेड) असे मृत्यू झालेल्या वृध्दाचे नाव आहे. याबाबतची फिर्याद 27 जून रोजी मुलगा शैलेश उतेकर (30) याने खेड पोलीस स्थानकात दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्ताराम उतेकर हे मुंबईहून मूळ गावी खेड आले होते. 20 मे रोजी ते आंबे काढण्यासाठी झाडावर चढले असता पाय घसरुन पडले. यात त्यांच्या मानेला, उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली. त्यांना प्राथमिक उपचार करुन मुंबई येथील के. ई. एम. रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरु असताना 31 मे रोजी दुपारी 1.50 वा. च्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. शैलेश उतेकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस नाईक शेख करत आहेत.