[ रत्नागिरी /प्रतिनिधी ]
शहरातील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल झाडगाव येथे प्रति वर्षाप्रमाणे यावर्षी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संस्थेच्या वतीने स्वामी विवेकानंद जयंती सप्ताह व क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 12 जानेवारी, 2024 रोजी स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जयंती प्रित्यर्थ प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून साप्ताहाचा प्रारंभ झाला.
या सप्ताहामध्ये विविध कला, क्रीडा, सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात येत असते. यावेळी संस्थेचे अजीवसेवक तथा विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री शशिकांत काटे, शिक्षक तानाजी गायकवाड, अशोक सुतार, दिपक पाटील, सुरेश चौगुले, क्रीडा शिक्षक एम.डी. पाटील, अमोल मंडले, सैफुद्दीन पठाण, स्वामी विवेकानंद विद्यार्थी वस्तीगृहाचे अध्यक्ष गजानन बागडी, सागर कदम, स्वप्नाली भुजबळराव, शिक्षकेत्तर कर्मचारी फगरे मामा, पवार मामा, वसतिगृहाचे साळवी मॅडम बागडी मॅडम, कोळबेकर मॅडम आदिसहित विद्यालयातील इयत्ता पाचवी ते दहावी अखेरचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाची सुरुवात प्रथमेश पुष्पहार अर्पण करून व ईशस्तवनाने झाली. यानंतर रत्नागिरी शहरात विद्यालय असलेल्या ठिकाणी व आसपासच्या परिसरात प्रभात फेरी व शोभायात्रेचे आयोजन ही विद्यालयाच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी लेझीम पथक व झांज पथक हे विशेष आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले. ढोल ताशांच्या गजरात वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली. यानंतर आयोजित कार्यक्रमात आपल्या प्रास्ताविकातून शिक्षक दीपक पाटील यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. विद्यालयातील अध्यापकांनी व विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगताच्या माध्यमातून स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या बद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या.
अध्यक्षीय मार्गदर्शन करत असताना संस्थेचे आजीवसेवक तथा विद्यालयाचे मुख्याध्यापक शशिकांत काटे यांनी या दोन्ही महान कर्तुतत्वान व्यक्तींचा थोडक्यात आढावा घेतला. दुसऱ्या दिवशी (शनिवार दि. 13 जानेवारी, 2024) रोजी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले रत्नागिरी वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक मिलिंद चव्हाण साहेब यांच्या हस्ते क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले. विद्यालयाच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. वाहतूक शाखेचे ए. एस. आय. नारायण रोडे सर, सुशील कदम आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलीत करून क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले. शाखेचे पोलीस उपनिरीक्षक मंदार चव्हाण शिक्षक तानाजी गायकवाड यांनी आपल्या मनोगतातून खेळाडू विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. यानंतर इयत्ता पाचवी ते दहावी अखेरीस नऊ संघांनी संचलनाच्या माध्यमातून क्रीडा ज्योतीला सलामी देत उपस्थितांची वाहवा मिळवली.
इयत्ता पाचवी ते सातवी आणि आठवी ते दहावी असे विद्यार्थ्यांचे मिक्स गट करण्यात आले होते. वाघाची तालीम, टायगर सुलतान, शिवभक्त, तिरंगा, जय भैरी, नारीशक्ती, हिरकणी, जय भवानी
अशी संघांना नावे देण्यात आली होती. आगळ्या-वेगळ्या आणि दिमाखदार वातावरणात उद्घाटन झालेल्या या क्रीडा सप्ताहाचे वैशिष्ट्य पाहून सर्वच मान्यवर भारावून गेले. विद्यालयातील विद्यार्थ्यांची संख्या कमी असली तरी क्रीडा सप्ताहासाठी विद्यार्थ्यांचा जोश हा उत्साह पूर्ण होता. संस्थेच्या साडेतीनशे शाखांमध्ये वेगळ्या पद्धतीने क्रीडा सप्ताहाचे आयोजन या विद्यालयात केले जात असल्यामुळे याचे एक वेगळे वैशिष्ट्य या ठिकाणी दिसून आले.
क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन लहान गटाच्या कबड्डीच्या सामन्याने झाले. स्वामी विवेकानंद जयंती सप्ताह व क्रीडा सप्ताहामध्ये कला, क्रीडा व सांस्कृतिक विविध भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन विद्यालयांमध्ये करण्यात आले आहे. प्रथम तीन क्रमांक विजेत्या स्पर्धकांची निवड विभागीय स्तरावर तसेच त्यानंतर राज्यस्तरावर होणार आहे. विद्यालयाचे शिक्षक दीपक पाटील व सैफुद्दीन पठाण यांच्या विविध घोषणांच्या माध्यमातून वातावरण उत्साहवर्धक व जोशपूर्ण झाले. आनंददायी वातावरणात संपन्न झालेला कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर व विद्यार्थी या सर्वांनीच विशेष मेहनत घेतली. यावेळी नारायण रोडे, सुशील कदम, मिलिंद चव्हाण, गायकवाड सर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्रसंचालन शिक्षक दिपक पाटील यांनी केले तर आभार शिक्षक सैफुद्दीन पठाण यांनी मानले.