(रत्नागिरी)
संगमेश्वर तालुक्यातील आंबेड बुद्रुक गावातील रत्नागिरी जिल्हाला परिचित असणारे माजी शिक्षक कै.श्री बाळाराम धोंडू आंबेकर यांच्या सामाजिक कार्याची परंपरा अविरत सुरू रहावी म्हणुन पारिजात फाउंडेशन च्या माध्यमातूनमुंबई आणि रत्नागिरीमध्ये अनेक सामाजिक कार्य केले जाते.
आमच्या पिढीने पुस्तकांशी मैत्री करावी म्हणून आंबेड बुद्रुक तेथे वाचनालय सुरू करीत आहे. गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी मधील प्राध्यापक डॉ. आनंद आंबेकर यांनी काही दिवसांपूर्वी जुनी पुस्तके डोनेट करावी असे आवाहन केले होते.त्याला प्रतिसाद म्हणून ज्येष्ठ लेखक श्री. विजय साळवी यांनी आपल्या 61 व्या वाढदिवसाला 61 पुस्तके डोनेट करून आगळ्या वेगळ्या पद्धतीने वाढदिवस भेट दिली.
समाजातील सर्वानाच डीजिटल दुनियेतील पुस्तकांशी मैत्री करावी आपले आंतरिक शक्ती समृद्ध करावी असा प्रामाणिक उद्देश ठेऊन चला पुस्तकांशी मैत्री करू. असा उद्देश ठेऊन स्वतःच्या गावापासून पारिजात फाउंडेशनच्या माध्यमातून कार्य करावे म्हणून पूर्वा महेश आंबेकर यांनी कल्पना मांडली आणि ती साकारत आहे.