( रत्नागिरी )
रत्नागिरीतील ज्येष्ठ रंगकर्मी, राधाकृष्ण कलामंच रत्नागिरीचे हरहुन्नरी कलाकार श्रीकांत विनायक ऊर्फ शाम केळकर यांचे १२ जानेवारी रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.
लहानपणापासून अभिनयाची आवड त्यांनी जोपासली होती. राधाकृष्ण कलामंच या रत्नागिरीतील नाट्यसंस्थेकडून त्यांनी सुमारे ५-७ नाटकांमध्ये अभिनय सादर केला होता. परंतु त्यातील पंडितराज जगन्नाथ या नाटकाच्या १०-११ प्रयोगात त्यांचा अधिक सहभाग होता. त्यांनी रंगभूमीची सुमारे २५ वर्षे सेवा केली आहे. रंगभूमी तसेच पडद्यामागील कलाकार म्हणून त्यांची ओळख होती.