(क्रीडा)
बर्मिंगहॅम येथे सुरु असणाऱ्या राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत भारताची महिला ज्युदो खेळाडू तुलिका मान फायनलमध्ये प्रवेश करत पदक निश्चित केले. तिने महिलांच्या 78 किलोवरील गटात अंतिम फेरीत प्रवेश केला. सेमीफायनलमध्ये तुलिकाने ऑस्ट्रेलियाच्या सिडनी अँड्र्यूज चा 10-1 अशा एकतर्फी धुव्वा उडविला. तुलिकाने उपांत्यपूर्व फेरीतही मॉरिशसच्या डरहोनचा एकतर्फी पराभव केला होता. तुलिकाचा फॉर्म पाहता तिचे स्पर्धेतील सुवर्णपदक निश्चित असल्याचे मानले जात आहे.
22 व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या सहाव्या दिवशीही भारताने पदकांची लयलूट सुरूच ठेवली. बॅडमिंटनमधील मिश्र सांघिक प्रकारात भारताने रौप्यपदक पटकावले. वेटलिफ्टर लवप्रीत सिंगने 109 किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावले. तसेच महिला ज्युडो खेळाडू तुलिना मानने फायनलमध्ये प्रवेश करत देशासाठी पदक निश्चित केले. तर, महिला बॉक्सर नीतू घनघसन व पुरुष बॉक्सर मोहम्मद सामुद्दिन यांनीही पदके निश्चित केली आहेत. याशिवाय भारतीय महिला संघानेही सेमीफायनलध्ये धडक मारून पदकाच्या आशा पल्लवित केल्या.