काही महाभाग स्वयंघोषित पत्रकारांनी माझी चूक नसताना माझ्या विरोधात बातम्या छापून आणल्या. काहींना झोप लागण्यासाठी गोळी घ्यावी लागते पण माझ्यावर टीका करून झोप लागणार असेल तर काही हरकत नाही. बीजेपी जिल्हाध्यक्ष दीपक पटवर्धन यांनी टीका केल्यास त्याला उत्तर देईन मात्र बाळ मानेंची दखल कोणी घेत नाही. त्यांच्या शिव्या माझ्यासाठी ओव्या आहेत. यापुढे त्यांच्या कोणत्याही वक्तव्याची दखल घेतली जाणार नाही. ज्यांना लोकाश्रय नाही, ज्यांना जनतेने दोन तीन वेळा नाकारलंय त्यांचा मी आदरच करतो. ही राजकारणाची वेळ नाही, या महामारीतून जनतेला दिलासा देणे हेच माझे ध्येय आहे असे वक्तव्य ना. उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.
राजापूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत उदय सामंत यांनी 45 वयाच्या वरील नागरिकांना वार्यावर सोडल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. तसेच माहिती कार्यालयाला मिळालेल्या कॅमेर्याचे त्यांच्या हस्ते एक क्लिक करून उद्घाटन झाले. मात्र ही पूर्ण माहिती न घेता विनय नातू, बाळ माने यांनी त्यांच्यावर टीका केली. त्यांच्या टीकेला झुम अॅपद्वारे झालेल्या पत्रकार परिषदेत ना. उदय सामंत यांनी जशास तसे उत्तर दिले आहे. ते म्हणाले की भाजपच्या अनेक पुढार्यांच्या सूचनांचे आजवर पालन करण्यात आले. बाळ माने यांनी सूचना केली यश फाउंडेशनच्या विद्यार्थ्यांना सामावून घ्या, 62 विद्यार्थिनी आम्ही घेतल्या. अनेक आरोग्यविषयक सूचना त्यांच्याकडून मी घेतल्या, अजून देखील घेत राहीन. दीपक पटवर्धनांनी टीका केली तर त्याला उत्तर देऊ, बाळ मानेंची दखल कोण घेत नाही. ते सीनियर आहेत, मात्र प्रत्येकाला मंत्री व्हायला नशीब लागते. माझ्या नशीबी होते मी झालो अशा कोपरखळ्या ना उदय सामंतांनी पत्रकार परिषदेत हाणल्या.