(खेड / इक्बाल जमादार)
खेड तालुक्यातील ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ, खेड (रत्नागिरी) या शैक्षणिक संस्थेच्या कै. श्रीमती राधाबाई चंदुलाल तलाठी ज्ञानदीप विद्या मंदिर, भडगाव उच्च माध्यमिक विभागातील इ. 12 वी विज्ञान वर्गातील सुयश अनिल पाटील 99.13 % मिळवून JEE Main परीक्षेत जिल्हयात प्रथम आला आहे.
तसेच यशश्री गणोजी माने 97.53 % मिळवून प्रशालेत द्वितीय, अथर्व सुनील यादव 97.24 % मिळवून तृतीय, आदित्य विजय भोसले 95.15 % मिळवून प्रशालेत चौथा, साहिल विजय घाटगे 94.66 % मिळवून पाचवा, तेजस सचिन पोकळे 93.70 % मिळवून सहावा, दुर्वा प्रेषित तोडकरी 93.66 % मिळवून सातवी, यशिता प्रदीप जाधव 91.88 % मिळवून आठवी, सान्वी रुपल पाटणे 91.75 % मिळवून नववी, दिग्विजय दिलीप माणगांवकर 90.86 % मिळवून दहावा, समर शशिकांत बैकर 90.85 % मिळवून अकरावा या विद्यार्थ्यांनी JEE Main परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले आहे.
हे सर्व विद्यार्थी JEE Advanced परीक्षेस पात्र ठरतील. या विद्यार्थ्यांना प्रशालेतील मार्गदर्शक शिक्षक विठ्ठल सकुंडे, कांतिनाथ शिंदे, पंकज हालके, मकरंद दाबके, अभिजीत शेळके, अश्विनी पाटील, तसेच कोटा येथील तज्ज्ञ मार्गदर्शक समीर सेठी, विशाल कोळेकर, सूर्या मोहन सिंग यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.
यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी, उपाध्यक्ष माधव पेठे, सरचिटणीस प्रकाश गुजराथी, नियामक मंडळाचे चेअरमन पेराज जोयसर, तसेच पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागाच्या नियामक मंडळाचे चेअरमन विनोद बेंडखळे, प्रशाला समितीचे चेअरमन भालचंद्र कांबळे, ज्ञानदीप महाविद्यालयाच्या नियामक मंडळाचे चेअरमन दीपक लढढा व सर्व सल्लागार, ज्ञानदीप परिवारातील सर्व मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.