(खेड)
खेड तालुक्यातील भडगांव – खोंडे येथील ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कै. प्रभाकर गजानन कांबळे ज्ञानदीप विद्या मंदिर मधील विद्यार्थी माध्यमिक विभाग इयत्ता १० वी परीक्षेत कु. परिमल विनोद स्वामी यांने ९९.४० टक्के गुण प्राप्त करून राज्यात ४ था आला. याबद्दल त्यांचे मनसे खेडतर्फे अभिनंदन करुन पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी पक्षाचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस तथा मा.नगराध्यक्ष श्री. वैभवजी खेडेकर, मनविसे मा. जिल्हाध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदु साळवी, डाॅ.सौ. अर्चना स्वामी मॅडम, शहराध्यक्ष सिद्धेश साळवी,जयेश गुहागरकर, समवेत स्वामी कुटुंबिय आदी उपस्थित होते.