मराठा आरक्षणासाठी तरुण मंडळी आता टोकाची पावलं उचलायला लागली आहे. आज मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांमध्ये तिशीतल्या तीन तरुणांनी आत्महत्या केल्यानं मराठवाडा हादरला आहे. या तिघांनीही सुसाईड नोट लिहून आपलं जीवन संपवलं आहे.
य जिजाऊ-जय शिवराय, जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत माझ्या शरीराला जाळू नका.. एक मराठा, लाख मराठा, असा मजकूर डिजीटल बोर्डवर लिहून एका तरुणाने जीवन संपवले. बीड रोडवरील आपतगावात (जि. छत्रपती संभाजीनगर) गुरुवारी (दि. २६) ही घटना घडली. मराठा आरक्षणासाठी तरुणांनी बलिदान देण्याच्या घटना काही दिवसांत वाढल्या असून राज्यातील बळींचा आकडा आता पन्नासहून अधिक झाला आहे जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत माझ्या शरीराला जाळू नका, असा मजकूर पाटीवर लिहून मराठा आरक्षणासाठी आपतगाव (ता. छत्रपती संभाजीनगर) इथं एका मराठा तरुणानं गुरुवारी (ता. २६) दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केली. गणेश काकासाहेब कुबेर (वय २८) असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचं नाव आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी हिंगोली जिल्ह्यातील बाळापूरपासून जवळ असलेल्या देवजना इथं एका तरुणानं गुरुवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. लहू उर्फ कृष्णा यशवंतराव कल्याणकर (वय २५) हा युवक शेतमजुरीचे काम करून ट्रॅक्टरवर चालक म्हणून काम करत होता.
गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे ट्रॅक्टरवर जाऊन तो हरभरा पेरण्यासाठी देवजना शिवारातील एका शेतकऱ्याच्या शेतात गेला होता. सोबत असणारे एका व्यक्तीला आता बाहेरुन जाऊन येतो असे म्हणून गेला. बराच वेळ झाला तरी तो न आल्याने आजूबाजूच्या लोकांनी परिसरात त्याला शोधण्याचा प्रयत्न केला. तर बाजूला असलेल्या शेतात त्याने झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. तिथंच एका चिठीमध्ये “मी मराठा आरक्षणामुळे जीव देत आहे” असं लिहून त्यानं आपलं जीवन संपवलं.