जैतापूर : येथील जैतापूरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी राकेश दांडेकर तर सचिवपदी सुनील करगुटकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
राजापूर तालुक्यातील जैतापूर बाजार पेठेतील गणेश चौक येथे गेल्या 21 वर्षांपासून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो सुरुवातीला नेहरू युवा मंडळाच्या माध्यमातून तत्कालीन संस्थापक अध्यक्ष कै. सचिन नारकर आणि विद्यमान सल्लागार जैतापूरचे माजी सरपंच गिरीश करगुटकर यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकाराने हा उत्सव सुरू करण्यात आला होता गेले एकवीस वर्ष अव्याहतपणे विविध उपक्रमांच्या आयोजनाने हा उत्सव अत्यंत उत्साहात साजरा होत असतो.
या सभेमध्ये यावर्षीच्या उत्सवासाठी नव्याने कार्यकारिणीची निवड करण्यात आली असून अध्यक्षपदी राकेश दांडेकर, उपाध्यक्षपदी भर्तृहरी भाटकर, सचिवपदी सुनील करगुटकर तर खजिनदार म्हणून वासुदेव नारकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तर कार्यकारणी सदस्य म्हणून श्रीमती शैलजा माजरेकर, सौ. दीपा मांजरेकर, सौ. रेशम लाड, श्रीमती मंगल मयेकर, सौ. सिद्धी शिर्सेकर, गजानन करमळकर निलेश पालकर यांची निवड करण्यात आली आहे.
सभेमध्ये या वर्षीचाही उत्सव अत्यंत साधेपणाने आणि सर्व नियमांचे पालन करून परंतु उत्साहात साजरा करण्यात यावा असे ठरविण्यात आले आहे. या सभेला मंडळाचे सदस्य आणि सल्लागार गिरीश करगुटकर, दिवाकर आडविरकर ,राजन लाड, राजेंद्र प्रसाद राऊत , दशरथ चाळके, हर्षद मांजरेकर विक्रांत नारकर ,महेश नारकर, प्रसाद करगुटकर ,दीपक नंदुरबारे, संदीप चव्हाण अलंकार मयेकर ,चेतन नारकर,तन्मय मांजरेकर, अमित नारकर आदी सदस्य उपस्थित होते.