(संगलट / इक्बाल जमादार)
जेष्ठ आणि श्रेष्ठ असे काही नसतं, श्रेष्ठ असते ते कर्म, आणि हे दापोली तालुक्यातील न्यू इंग्लीश स्कूल दमामे चे कर्तबगार मुख्याध्यापक अतुल पिटले यांनी आपल्या उत्कृष्ठ नियोजनाने दाखवून दिले असे दापोली तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी यांनी ५१ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या बक्षिस वातरण प्रसंगी गौरवोद्गार काढले. तसेच समाजासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान वापरुन तालुक्यातील अनेक बाल वैज्ञानिकांनी सुबक अशा प्रतिकृती बनवल्यामुळे विज्ञान प्रदर्शनात वेगळी रंगत आल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच दिलेली जबाबदारी गांभिर्याने घेण्यापेक्षा उरकण्याकडे कल असतो, पण दमामे सारख्या गावाने केलेले नेटके आयोजन, आदरातिथ्य पाहता ग्रामीण भागातील हे कार्य स्पृहनिय असल्याचेही बळवंतराव यांनी सांगितले.
दमामेचे उपसरपंच गंगाराम हरावडे यांचे अध्यक्षतेत संपन्न झालेल्या सदर समारंभास इशस्तवन व स्वागत गीताने प्रारंभ झाला. यावेळी माजी पं.स.सदस्य, प्रभाकर गोलामडे, गावच्या सरपंच अर्पिता शिगवण, भडवळे गावच्या सरपंच प्रिती खरे, शालेय समिती अध्यक्ष विनोद खेडेकर, विस्तार अधिकारी पद्मन लहांगे,संजय दरेकर आणि बळीराम राठोड तसेच सर्व केंद्रप्रमुख, सर्व संघटनांचे पदाधिकारी, शिक्षक तसेच पंचक्रोशीतील असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.
यशस्वी विज्ञान प्रदर्शनाचे सर्व श्रेय हे ग्रामस्थांचे आहे. शाळेतील आजी माजी विद्यार्थी यांनीही झटून योगदान दिल्यामुळे हे प्रदर्शन यशस्वी झाल्याचे अतुल पिटले यांनी प्रास्ताविक करतांना सांगीतले. तर काहीतरी आगळंवेगळं काम कराव, हे समजून प्रभागातील सर्व शिक्षकांना विश्वासात घेऊन तीन दिवसाचे अयोजन यशस्वी केल्याचे सांगत यजमान विस्तार अधिकारी बळीराम राठोड यांनी विज्ञान प्रदर्शनाचे पुढील दहा वर्षाचे नियोजन तयार असून, ग्रामीण भागातील शाळांना संधी दिल्यामुळे तालुक्याच्या काना कोपर्यातून चांगला प्रतिसाद मिळतो हे दमामेच्या लोकांनी दाखवून देत एक आदर्श घालून दिल्याचे दिसून आले, असेही राठोड यांनी सांगितले. तर अध्यक्ष गंगाराम हरावडे यांनी आपल्या गावात विज्ञान प्रदर्शन होणार ही अभिमानाची गोष्ट होती, आम्ही आमच्या गावाची शान नेहमीच वाढवत असतो शिक्षण विभागाने सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल गावच्या वतीने ऋणनिर्देश करीत यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत सर्वांना शुभेच्छा देत मनोगत व्यक्त केले.तर विज्ञान मंडळाचे तालुकाध्यक्ष आकाराम महिंद यांनी निकालाचे वाचन करीत मान्यवरांचे हस्ते बक्षिस वितरीत करणेत आले. या वर्षापासून दिव्यांग विद्यार्थ्यांना ही सहभागाची संधी दिली असून अपंग अपंग नसतात,अपंग असतात त्या समाजाच्या नजरा आणि ह्या नजराच बदलण्याच्या दृष्टीकोनातून दिव्यांग मुलांना सुध्दा स्पर्धेत सहभागी करणैत आले होते. शेवटी शाळेतील सहशिक्षक बाळू कुलाल यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले आणी तीन दिवसाच्या प्रदर्शनाची सांगता झाली. सदर सोहळ्याचे संपुर्ण सुत्रचालन संदेशराऊत यांनी केले.
सविस्तर निकाल पुढील प्रमाणे. प्राथमिक विद्यार्थी गट – प्रथम क्रमांक आर.आर.वैद्य च्या स्मार्ट हेल्मेट ने तर द्बितीय ए.जी.हायस्कूल दापोलीच्या सुरक्षीत घर आणि तृतीय क्रमांक जि.प.शाळा शिर्दे येथील वाहतुक सुरक्षा यंत्रणा व वीजनिर्मिती या प्रतिकृतींना मिळाला, तर माध्यमिक विद्यार्थी गटामध्ये,एन.के वराडकर हायस्कूल मुरुड शाळेतील सोलर पाॅवर टिलर ला प्रथम तर आर.आर.वैद्य दापोलीच्या स्टेअर केसला द्वीतीय तसेच ज्ञानदिप वाद्यामंदिर दापोलीच्या धान्य साठवण कोठीला तृतीय क्रमांकाचे बक्षिस देण्यात आले.
अध्यापक साहित्य निर्मितीमध्ये प्राथमिक शिक्षक गटातून ज्ञानदिप विद्यालय दापोलीचे विजय वणे यांच्या गणितीय क्रिया या साधनाला प्रथम तर जाणून घेऊ चंद्राला या लाडघर नं.२ शाळेच्या मंगेश शेडगे यांच्या साधनाला दुसरा तसेच खेळातून बैजिक राशींशी मैत्री या पि.डी.विद्यालय केळशी येथील शुभांगी आहिरे यांच्या प्रतिकृतीला तृतीय क्रमांक प्राप्त झाला.
माध्यमिक गटातील शिक्षक साहित्यासाठी, दमामे हायस्कूलच्या गणीत प्रयोग शाळा या रश्मी बुरटे यांच्या साधनाला प्रथम क्रमांक,तर विरेश्वर हायस्कूलमधीर राजाराम हिंग्लजे यांच्याचुंबकिय परिणाम या प्रतिकृतीला द्वितीय क्रमांक प्राप्त झाला.तसेच या गटातील तृतीय क्रमांक पंचनदी हायस्कूलच्या हसत खेळत भुमिती या साहित्यास तृतीय क्रमांक प्राप्त झाला.
परिचर स्पर्धेत, घनता दर्शक उपकरण पंचनदी हायस्कूलचे अजय वायंगणकर यांना प्रथम, तर टाकाऊतून टिकाऊ झाडू या करंजाणीचे विजय खापरे यांच्या साहित्यास द्वितीय क्रमांक आणि तृतीय क्रमांकासाठी टाळसूरे हायस्कूलच्या विजय गूरव यांच्या दाब या साहित्याची निवड करणेत आली. तर नव्याने समावेश झालेल्या दिव्यांग स्पर्धेत करंजाळीच्या प्रदिप मळेकरच्या नैसर्गिक आपत्ती सुरक्षित घर या प्रतिकृतीस तसेच आंजर्ले हायस्कूलच्या चिराग सांबरे यांच्या मिनी प्रोजेक्टरला प्रथम तर सारंग हायस्कूलच्या पायल जैशी हिच्या प्रदूषण आणि आरौग्य या प्रतीकृतीस द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. तर प्रश्न मंजुषेमध्ये ए.जी.हायस्कूल दापोली प्रथम तर नॅशनल हायस्कूलला द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशस्ती पत्र व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. शेवटी शाळेतील सहशिक्षक बाळू कुलाळ यांनी सर्वांचे आभार मानले आणि सांगता झाली.