( रत्नागिरी / प्रतिनिधी )
रत्नागिरी शहरातील स्वरूप अपार्टमेंट नाचणे रोड, सौभाग्य नगर येथे तरुणीने अजब कारणावरून आपले जीवन संपवल्याची घटना घडली आहे. जेवण पसंत पडले नाही म्हणून तरुणीने रागाच्या भरात घरातील बेडरूम मध्ये जाऊन फॅनला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना 30 नोव्हेंबर रोजी दुपारी 1.30 वाजण्याच्या सुमारास घडली. आत्महत्या करणाऱ्या मुलीचे नाव समजू शकले नाही. मुलीच्या आईने शहर पोलिस स्थानकात फिर्याद दाखल केली. शहर पोलिस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.