(पुणे)
सोमवती अमावस्या या तिथीला जेजुरीच्या खंडोबाच्या गडावर सोमवती यात्रा असते. हिंदू धर्मांच्या परंपरेनुसार जेजुरीच्या खंडोबाच्या गडावर सोमवती यात्रा पाहायला मिळत आहे. या यात्रेत भविक मोठ्या संख्येने आणि भक्तीभावाने सहभागी झाले होते. जेजूरी गडावर सोमवती यात्रेला विशेष महत्त्व दिले जाते. सकाळपासून भाविकांनी गडावर खंडोबाच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. या क्षणाला भंडारा उडवतं मोठ्या उत्साहाने खंडोबाचं नाव घेतात. ‘यळकोट यळकोट जय मल्हार’ या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता, भाविक मोठ्या आंनदाने हा क्षण साजरा करतात.
खांदेकरी, मानकरी खांद्यावर पालखी घेऊन जात असताना या सोहळ्यात भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा गडावर सोमवारी सोमवती यात्रा मोठ्या आवेशात संपन्न झाली. या दिवशी खंडोबाच्या उत्सव मूर्तींना कऱ्हा नदीमध्ये स्नान घातले गेले. या सोहळ्यामध्ये लाखोंच्या संख्येने भाविक सहभागी होत असतात. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांनी पालखी सोहळ्यात भाविकांनी पिवळ्याधमक भंडाऱ्याची मुक्त हस्ते उधळण केली. त्यामुळे जेजुरीला सोन्याचं रुप आलं होते. दुपारी एक वाजता खंडोबा म्हाळसादेवीच्या मूर्ती पालखीत ठेवून पालखी सोहळा कऱ्हा नदीवर स्नानासाठी निघाला. यावेळी ‘सदानंदाचा येळकोट” ‘यळकोट यळकोट जय मल्हार” असा जयघोष करीत हजारो भाविकांनी भंडाऱ्याची मुक्त उधळण केली. यामुळे सारा खंडोबा गडसोन्यासारखा पिवळा झाला होता.
महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा देवाच्या सोमवती अमावस्येनिमित्त जेजुरी गडावर चार लाख भाविकांनी गर्दी केली होती. यामध्ये मोठी चेंगराचेंगरी झाल्याचेही समोर येत आहे. जेजुरीत झालेल्या या दुर्घटनेमध्ये माऊली मल्हार मोरे (वय २५) विशाल राजेंद्र मोरे (वय २३ ) मयांक सचिन कदम (वय १३) निलेश अरुण मोरे( वय ३०) हे जखमी झाले आहेत. त्यांना जेजुरीतील आनंदी लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून जखमी झालेले सर्वजण खंडोबाचे मानकरी आहेत. यंदा नेहमीपेक्षा गर्दी प्रचंड असल्याने खंडोबा गडाला असणाऱ्या तीनही दरवाजामध्ये भाविकांची प्रचंड रेटारेटी व चेंगराचेंगरी झाली.