(रत्नागिरी)
जि. प. पू. प्रा. शाळा चाफे नं 1 येथे लोकमान्य टिळक व लोकशाहीर आण्णा भाऊ साठे जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या बाल सभेचे नियोजन इयत्ता 7 वी च्या वर्गाने केले होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन आर्यन घाणेकर याने केले. प्रास्ताविक स्वराज गोवळकर याने केले तर अध्यक्षस्थान अथर्व रहाटे याने भूषवले.
विद्यार्थ्यांची भाषणे झाली कु. लक्ष्मी पांढरे या इयत्ता 2 री तील विद्यार्थीनीने टिळकांच्या जीवनावर आपले विचार व्यक्त केले. श्री. देसाई यांनी आण्णाभाऊ साठे यांच्या विषयी माहिती सांगितली. कार्यक्रमाचे आभार सोमनाथ मांजरेकर याने मानले. या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.