रत्नागिरी:- जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य असोसिएशनच्या रत्नागिरी जिल्हा अध्यक्षपदी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने यांची निवड झाली. शनिवारी (ता. 19) झालेल्या बैठकीमध्ये यावर शिक्कामोर्तब करण्यात आला.
या बैठकीमध्ये राज्य असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. कैलास गोरे पाटील यांनी श्री. बने यांचे नाव जाहीर केले. यावेळी राज्याचे कार्याध्यक्ष उदय बने यांच्यासह इतर सर्व राज्य कार्यकारणी सदस्य आणि सर्व जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष उपस्थित होते. रोहन बने यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद नुकतचे भुषवले होते. कोरोना कलावधीमध्ये प्रशासनाशी समन्वय साधत चांगल्या पध्दतीने कामकाज चालवले. जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांना काम करत असताना अनेक अडचणी येत असतात, त्या पदाधिकार्यांच्या माध्यमातून मंत्र्यांपर्यंत मांडणे आणि त्यांची सोडवणुक करणे हा प्रमुख उद्देश आहे. यामध्ये अनेक ज्येष्ठ सदस्यांचा समावेश आहे.