( रत्नागिरी / प्रतिनिधी )
एल. आय. सी. ऑफ इंडिया शाखा रत्नागिरी (विभाग कोल्हापूर) यांच्या योजनेतून आणि विमा सल्लागार अजित बोंबले यांच्या प्रयत्नातून हातखंबा ग्रामपंचायतीला ‘विमा ग्राम’ विकास निधी प्राप्त झाला आहे. रत्नागिरी जिह्यात प्रथम हातखंबा ग्रामपंचायतीसाठी हा निधी वितरीत करण्यात आला.
हा वितरण सोहळा ‘विमा ग्राम’चा रत्नागिरी शाखा अधिकारी सुशांत देशपांडे, उपशाखाधिकारी संतोष चौधरी, श्रीकांत फगरे, विमा प्रतिनिधी अजित बोंबले, हर्ष फगरे, दिलीप पाचकले, पारस पावसकर, अमोल धावडे यांच्या उपस्थितीत पार पडला.
यावेळी हातखंबा ग्रामपंचायतीचे सरपंच जितेंद्र तारवे, माजी सरपंच-विद्यमान ग्रा. पं. सदस्या विद्या बोंबले, ग्रा.पं.सदस्य विलास बोंबले, ऍड. सुयोग कांबळे, कस्तुरी सनगरे, रश्मिता बोंबले, पूर्वा तारवे, रसिका सनगरे, रत्नप्रभा देसाई, ग्रामविकास अधिकारी दीपक पाल्ये, ग्रा.पं. लिपिक शुभम डांगे, तलाठी वाडकर, अंगणवाडी सुपरवायझर पाटील, कर्मचारी करिश्मा बोंबले, ओमकार बोंबले. आदिती बोंबले, सर्व अंगणवाडी सेविका, आशा सेविका व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सर्वांच्या उपस्थितीत 1 लाखाचा धनादेश वितरित करण्यात आला.