(चिपळूण / प्रतिनिधी)
जिल्ह्यातील उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्या श्रमाचा, उद्योजकीय कौशल्याचा गौरव करणे, अभिनंदन करणे यासाठी विविध पुरस्कार देण्यात येणार असल्याची माहिती फेडरेशनचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पटवर्धन यांनी दिली. हे पुरस्कार फेडरेशन ऑफ रत्नागिरी डिस्ट्रिक्ट चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज या संस्थेतर्फे देण्यात येणार आहेत.
यावेळी फेडरेशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष राजेंद्र सावंत म्हणाले की, उद्योजकता पुरस्कार हा पाच वर्षांपेक्षा अधिक कालावधीसाठी जिल्ह्यात उत्पादन उद्योग करून जिल्ह्याच्या विकासात हातभार लावणाऱ्या उद्योजकास देण्यात येणार आहे. विशेष उद्योजकीय पुरस्कार हा एखाद्या उद्योजकाने आपल्या नाविन्यपूर्ण कल्पकतेने उद्योगाच्या माध्यमातून आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवून उद्योग व्यापार आणि शेती या कोणत्याही क्षेत्राला विकसित करण्यासाठी योगदान दिले आहे अशा उद्योजकाला सन्मानित करण्यात येणार आहे, तर रत्नागिरी भूषण उद्योग पुरस्कार 25 वर्षापेक्षा अधिक कालावधीत जिल्ह्यात उद्योग क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या उद्योजकाला देण्यात येणार आहे.