( प्रतिनिधी / रत्नागिरी )
जिल्ह्यातील बागायतदार, शेतकऱ्यांना ‘विमा योजने’चे संरक्षण कवच देण्यात आले आहे. या योजनेतून जिल्ह्यातील एकूण 32 हजार 398 आंबा व काजू शेतकऱ्यांनी ‘विमा’ कवच घेतले आहे. यामध्ये 26 हजार 518 आंबा बागायतदार आहेत.
जिल्ह्यात या योजनेतून गतवर्षी विक्रमी 94 कोटी 41 लाख विमा परतावा बागायतदार शेतकऱ्यांना विमा मिळाला होता. गतवर्षीच्या तुलनेत सव्वासहा हजार अधिक बागायतदारांनी विमा योजनेला प्रतिसाद दिला आहे.
यंदा 2022-23 या वर्षात विमा उतरवणाऱ्या आंबा बागायतदारांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. सर्वाधिक विमा रत्नागिरी, संगमेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांनी उतरवला आहे. तर सर्वात कमी विमा गुहागर तालुक्यातील शेतकऱ्यांनी उतरवला आहे.