(रत्नागिरी)
रत्नागिरी जिल्हा अजिंक्यपद तायक्वांदो स्पर्धा रत्नागिरी शहरात छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम जिल्हा क्रीडा संकुल बॅडमिंटन हॉल येथे दिनांक 17 ते 19 रोजी पार पडल्या. सदर स्पर्धेत साळवी स्टॉप नाचणे ओम साई मित्र मंडळ सभागृह युवा मार्शल तायक्वांदो ट्रेनिंग सेंटर साळवी स्टॉप प्रशिक्षण केंद्र मधील खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
सदर स्पर्धेत पुमसे चे व क्योरोगी प्रकारात 37 सुवर्णपदक 20 रौप्य पदक 28 कास्यपदक असे एकूण 84 पदक संपादन मिळवून जनरल चाम्पियानशिप पटकावले. तसेच पूमसे प्रकारात प्रथम क्रमांक पटकावून घवघवीत यश संपादन केले. हे यशाबद्दल युवा मार्शल तायक्वांदो ट्रेनिंग सेंटरचे अध्यक्ष कोमल सिंह व सर्व पदाधिकारी तसेच अन्नपूर्णा संगीत विद्यालय ओम साई मित्र मंडळचे अध्यक्ष श्री आनंत आगाशे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच सुवर्णपदक विजेते खेळाडू मुंबई येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कॅडेट स्पर्धेसाठी निवड झाल्याने महाराष्ट्र तायक्वांदो असोसिएशनचे कोषाध्यक्ष व रत्नागिरी तायकोंदो स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष वेंकटेश्वरराव कररा, उपाध्यक्ष विश्वदास लोखंडे, कोषाध्यक्ष शशांक घडशी, सचिव लक्ष्मण कररा, सदस्य संजयसुर्वे यांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.
विजेते खेळाडू पुढील प्रमाणे आहेत.
सुवर्णपदक विजेते खेळाडू – मयुरी कदम, स्वरा टेरवनकर, अस्मी साळुंखे, संस्कृती सपकाळ, उपर्जना कररा, श्रियांश कांबळे, आराद्य तहसीलदार, अर्जुन पवार, मंथन आंबेकर, सार्थक गमरे, भार्गवी पवार, योगराज पवार, सई सुवरे, नुपूर दप्तरदार, अमेय पाटील, वेदांत देसाई, अमीन बुडये, परिक्षित कांबळे, लतिका जैनापुरे, निलाक्षी रहाठे
रौप्य पदक विजेते खेळाडू – ओवी काळे, अरहा आयरे, तुषार पाटील, श्रुती काळे, हर्षदा मोहिते, प्रतीक पवार, संबोधी जाधव
कांस्य पदक विजेते खेळाडू – साधना गमरे, रिद्धी धुळप, रुद्रा सुर्वे, सुधांशू कांबळे
वरील सर्व पदक विजेते खेळाडूंना भ मुख्य प्रशिक्षक राम कररा, सह प्रशिक्षक तेजकुमार लोखंडे अमित जाधव महिला प्रशिक्षिका सौ.शशिरेखा कररा यांचे मोलाचे सहकार्य लाभले.