( रत्नागिरी / प्रतिनिधी )
“जागरुक पालक सुदृढ बालक” अभियान अंतर्गत ० ते १८ वयोगटातील मुलांकरीता आरबीएसके डिईआयसी विभागाच्या माध्यमातून अस्थिव्यंग शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन ०४ व ०५ मार्च २०२३ रोजी जिल्हा रुग्णालय रत्नागिरी येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून ०- १८ वयोगटातील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करुन गंभीर आजारांवर वेळीच पायबंद घालणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या शस्त्रक्रिया शिबिरामध्ये एकूण ४४ मुलांची तपासणी करण्यात आली व त्यामधून एकूण १० मुलांची अस्थिव्यंग शस्त्रक्रिया डॉ. रोहित जैन (पेडियाट्रिक ऑर्थोपेडिक सर्जन मुंबई) यांचेकडून जिल्हा रुग्णालय रत्नागिरी येथे यशस्वीपणे करण्यात आल्या.
हे शिबिराचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी, मा.जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा कार्यक्रम पर्यवेक्षक आरबीएसके, डिईआयसी व्यवस्थापक व रुग्णालयीन वैद्यकिय पथक यांचे मार्गदर्शनाखाली शिबिराचे यशस्वीरित्या नियोजन करण्यात आले होते. यासोबत ऑपरेशन थिएटर स्टाफ व बालरुग्ण कक्षाचे मोलाचे सहकार्य लाभले.