रत्नागिरी : देवरुख येथील मातृमंदिर कोविड डेलिकेटेड सेंटरच्या मदतीसाठी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने पुढाकार घेत एक लाख रुपयाची देणगी दिली . संगमेश्वर विधानसभा मतदार संघाचे आमदार शेखर निकम यांचे हस्ते कार्याध्यक्ष अभिजित हेगशेटये यांना चेक प्रदान करण्यात आला. यावेळी जिल्हा बॅंकेचे संचालक राजू सुर्वे, संचालक नेहा माने, मॅनेजिंग डायरेक्टर गुरव आदी मान्यवर उपस्थित होते.
आमदार शेखर निकम, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष डॅा तानाजीराव चोरगे, उपाध्यक्ष बाबाजी जाधव आणि संचालक मंडळाच्या विशेष प्रयत्नाने प्राप्त झालेल्या निधीतून मातृमंदिर हॅास्पिटल जनरल वार्डसाठी १० बेड घेण्यात येणार आहेत.
मातृमंदिर कोविड सेंटरच्या निमित्ताने सुरु झालेल्या या आरोग्य चळवळीतून या भागात अद्ययावत रुग्णालयाची अपेक्षा आणि गरज जनतेकडून व्यक्त होत आहे. हळबे मावशी यांनी १९५४ साली सुरु केलेली ही आरोग्य सुविधा परिसरातील १०० गावांचा आधार होती . आज ती किती तरी पटीने अद्ययावत होणे ही काळाची गरज असून मातृमंदिर संस्था लवकरच मल्टीस्पेशालीटी हॅास्पिटलचा २० कोटीचा प्रकल्प हाती घेणार असल्याचे कार्याध्यक्ष अभिजित हेगशेटये यांनी सांगितले .
मातृमंदिरच्या अद्ययावत रुग्णालयाची या परिसराला नितांत गरज आहे. लोकांच्या मोठ्या अपेक्षा आहेत. यासाठी सर्वती मदत करण्यासाठी आम्ही आपल्या सोबत आहेत हा प्रकल्प आपण पुर्णत्वास नेऊच, असा विश्वास यावेळी आमदार शेखर निकम यांनी व्यक्त केला.