(संगमेश्वर / श्रीराम शिंदे)
अतिशय दुर्गम भाग असलेल्या व ज्यांचे पालक मोलमजुरी करुन आपले दैनंदिन जीवन उदरनिर्वाह करणारे अशा पालकांना आपल्या पाल्यासाठी सर्व सुविधा पुरवठा करणे शक्य होत नाही. मात्र अशावेळी श्री स्वामी ओम माऊली ट्रस्ट मुंबई धावून आली आहे. अतिशय थंडीचे दिवस असताना या थंडीपासून विद्यार्थी सुरक्षित राहावे विद्यार्थ्यांची गरज लक्षात घेऊन अतिशय दुर्गम भागात असलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत स्वेटर वाटप करण्यात करण्यात आले.
यावेळी शालेय व्यवस्थापन समिती शिक्षक पालक संघ माता पालक संघातील सदस्य उपस्थित होते. तसेच गावातील शिक्षणप्रेमी श्री राजू तांबे यांचे योगदान खूप मोलाचे आहे. साहित्य वाटप करण्यासाठी श्री. स्वामी ओम माऊली ट्रस्ट मुंबई अध्यक्ष श्री.बसवणकर तसेच उपस्थित मान्यवर सौ.सिताताई सुतार, श्री. विशाल कवडे, श्री.प्रदीप बसवनकर, श्री.प्रकाश बसवणकर, श्री.मंगेश घाटकर, श्री.रमेश मोहिते तसेच प्रतिभा पवार, आशा मोहिते, वेदीका कदम, आशा तांबे, अंगणवाडी सेविका निकिता महाडीक, नेहा मोहिते आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम.बबिता बिरादार व सहकारी शिक्षक श्री.बालाजी शेरीकर यांनी मान्यवरांचे आभार मानले.