(रत्नागिरी)
महाराष्ट्र राज्य आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी नुकतीच डॉ.परशुराम निवेंडकर यांची निवड करण्यात आली. त्यानंतर संघटनेच्या वतीने जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची भेटीची वेळ संघटनेच्या वतीने घेण्यात आली होती. त्याप्रमाणे सोमवार दिनांक २१/८/२०२३ रोजी जिल्हाभरातून उपस्थित संघटना पदाधिकारी यांनी डॉ अनिरुद्ध आठल्ये यांची भेट घेतली. या वेळी कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन वेळेत व्हावे, आश्र्वासित प्रगती योजनेचे काम तत्काळ पूर्ण करावे, कर्मचारी यांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी प्रशिक्षण आयोजित करावीत, पदोनत्ती तत्काळ करावी, कर्मचाऱ्यांना पगार दाखले मिळावेत, गोपनीय अहवाल, मेडिकल बिले, भविष्य निर्वाह निधी प्रकरणे इत्यादी विषयी चर्चा करण्यात आली. त्याप्रमाणे संबंधित अधिकारी यांना पूर्तता करण्याच्या सूचना आरोग्य अधिकारी यांनी दिल्या.
सर्वच विषयावर सखोल चर्चा करून उत्तम प्रतिसाद डॉ अनिरुद्ध आठल्ये दिला असल्याचे जिल्हाध्यक्ष परशुराम निवेंडकर यांनी सांगितले. यावेळी त्यांचेसमवेत सचिव दीपक गोरीवळे, कोषाध्यक्ष विनोद जाधव राज्य संघटक गजानन साळुंखे, सल्लागार श्रीशंकर केतकर नरेश इदाते, कार्याध्यक्ष मंगला पराडके, मदन जांनवलकर, उपाध्यक्ष विजय मालगुंडकर, सहसचिव अभिजित मोडशिंग, सहकोषाद्यक्ष विवेक गावडे, तालुका संघटक अभय देसाई खेड, भारत गांधी चिपळूण, वैभव जाधव गुहागर, व प्रसिद्धी प्रमुख गणेश वाघ, ज्येष्ठ सदस्य बंड्या भस्मे उपस्थित होते.